१ मेपासून एलपीजी नियमांमध्ये मोठे बदल
गॅस डिलिव्हरीसाठी OTP अनिवार्य
बुकिंगसाठी नवीन नियम लागू होणार
उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी e-KYC आवश्यक
१ मे पासून एलपीजी सिलिंडरच्या नियमांत मोठे बदल होणार आहेत. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वासामान्यांना दिलासा मिळणार आहे. १ मे पासून गॅस बुकिंगशी संबंधित नियमात मोठा बदल होणार आहे. आता शहरांमध्ये २१ ते २५ दिवसांनंतर, तर गावांत ४५ दिवसांनंतरच गॅस सिलिंडरचं नवीन बुकिंग करता येईल.
१ मेपासून गॅस सिलिंडर डिलिव्हरीसाठी OTP अनिवार्य असेल. तसंच उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी e-KYC पूर्ण करणं गरजेचं असेल. त्याचसोबत, आंतरराष्ट्रीय तणावामुळे गॅसच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बदलांमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (इन्डेन), भारत पेट्रोलियम (भारत गॅस) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी गॅस) या तीन प्रमुख तेल कंपन्या गॅसची साठेबाजी आणि गैरवापर रोखणे आणि त्याचे योग्य वितरण करण्याच्या उद्देशाने नवीन नियम लागू करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. १ मे पासून ते या नियमांमध्ये बदल करणार आहेत.
नवीन नियमानुसार, एलपीजी गॅस सिलिंडर बुक करण्यामधील कालावधी वाढवण्यात आला आहे. शहरांमध्ये ग्राहकांना आता बुकिंगसाठी २१ ते २५ दिवस थांबावे लागेल, तर ग्रामीण भागात हा कालावधी ४५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. जर एखाद्या ग्राहकाने निर्धारित वेळेची मर्यादा संपण्यापूर्वी सिलेंडर बुक करण्याचा प्रयत्न केला तर सिस्टीम आपोआप त्यांचे बुकिंग ब्लॉक करेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.