सर्वसामान्यांना झटका, घरगुती गॅस सिलिंडर महागणार? सरकार महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

LPG Gas Cylinder News : सर्वसामान्यांना झटका बसण्याची शक्यता आहे. गॅस सिलिंडरचे दर .
LPG Gas Cylinder
LPG Gas CylinderSaam tv
Published On
Summary

देशात गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत

गॅस सिलिंडरचे दर वाढण्याची शक्यता

मे महिन्यात गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यासंदर्भात सरकार निर्णय घेण्याची शक्यता

इराण आणि अमेरिकेमधील युद्धाचा परिणाम गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर होत आहे. देशात गॅस सिलिंडरचे नवे कनेक्शन देणे बंद केलं आहे. सरकारने आता पीएनजी कनेक्शन देण्यावर भर देणे सुरू केलं आहे. तरीही भारतीयांनी चिंता करण्याची गरज नाही. सरकार तब्बल १५ देशांतून कच्चा तेल आणि गॅस खरेदी करत आहे. परंतु मे महिन्यात गॅस सिलिंडरचे दर बदलण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

LPG Gas Cylinder
LPG Cylinders: गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल होणार, केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

देशभरात आज २६ एप्रिल रोजी गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. परंतु प्रमुख शहरात १४.२ किलो स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत ९१०-९५० रुपयांदरम्यान आहे. तर मागील काही दिवसांत व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाली होती. त्यानुसार, गॅसचे दर पाहायला मिळत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी देशात गॅसचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

दिल्लीत आज आज घरगुती सिलिंडरचा दर 913.50 रुपये, मुंबई ९१२.५ रुपये, कोलकाता ९३९ रुपये, चेन्नईमध्ये ९३८.५ रुपये, बेंगळुरूत ९१५.५ रुपये, पटना १००२.५ रुपये शिमला, ९५८.५ रुपये, श्रीनगर १०२९.० रुपये इतकी आहे. ७ मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले होते. जवळपास ३ वर्षांनंतर सिलिंडरचे दर वाढवण्यात आले आहेत.

दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरचा दर २०७८.५ रुपये, मुंबईचा दर २०३१ रुपये, कोलकाता २२०८.५ रुपये, चेन्नईत २२४६.५ रुपये, बेंगळुरू २१६१ रुपये,पटना २३५३.५ रुपये इतकी आहे. श्रीनगरमध्ये २३८५ रुपये इतकी आहे. इराण-अमेरिकेच्या युद्धामुळे व्यावसायिक गॅसचे दर दोन वेळा वाढवले आहेत.

LPG Gas Cylinder
LPG Rate Update : सर्वसामान्यांना दिलासा; एलपीजी सिलिंडरचे दर घसरले की वाढले? काय आहेत आजचे ताजे दर?

तत्पूर्वी, फेब्रुवारी महिन्यात इराण-अमेरिका युद्धामुळे देशभरात गॅस पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यानंतर केंद्र सरकारने व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा रोखला होता. परंतु आता सरकारने व्यावसायिक गॅसचा पुरवठा ७० टक्के इतका केला आहे. तसेच सरकार पीएनजी कनेक्शन घेण्यासाठी आग्रह करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com