LPG Rate Update : सर्वसामान्यांना दिलासा; एलपीजी सिलिंडरचे दर घसरले की वाढले? काय आहेत आजचे ताजे दर?

LPG Rate Update news : सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. एलपीजी सिलिंडरचे दर आज स्थिर राहिल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय.
LPG Rate
LPG Rate UpdateSaa tv
Published On
Summary

युद्धामुळे एलपीजी गॅस सिलिंडर पुरवठ्यावर परिणाम

गॅस पुरवठ्यावरून ग्राहकांवर निर्बंध

एलपीजी गॅस सिलिंडरचे दर स्थिर

LPG Price Today: इराण-इस्त्रायल, अमेरिका युद्धामुळे भारतातील एलपीजी गॅस सिलिंडर पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. भारत सरकारने गॅस सिलिंडर पुरवठ्यावरून ग्राहकांना अनेक निर्बंध लावले आहेत. तसेच पीएनजी कनेक्शन घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं जात आहे. मागील काही दिवसांत युद्धामुळे गॅस सिलिंडरसहित पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला वाढल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आज मंगळवारी एलपीजी गॅस सिलिंडरचे दर स्थिर राहिल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

गॅस सिलिंडरचे दर स्थिर राहिल्याने घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. देशाची राजधानी दिल्लीत १४.२ किलो घरगुती गॅस सिलिंडरचा आज दर ९१३ रुपये आहे. तर व्यावसायिक सिलिंडर २०७.५० रुपये इतका आहे.

LPG Rate
LPG Cylinder: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गॅस सिलिंडरचे टेन्शन संपणार

सरकारचं म्हणणं आहे की, 'एलपीजी सिलिंडर पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. परंतु आता देशातील स्थिती सुधारण्यासाठी सरकार मोठं पाऊल उचलताना दिसत आहे. पेट्रोलियम मंत्रालयानुसार, 'देशात गॅस उत्पादन वाढवणे आणि पुरवठा व्यवस्थित करण्यावर भर दिला जात आहे'.

देशात गॅस बुकिंग करण्याचा अवधी वाढवण्यात आला आहे. गॅस सिलिंडरचा गैरवापर रखण्यासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड लागू करण्यात आला आहे. या सिस्टमनुसार सुमारे ९२ टक्के उद्दिष्ट साध्य झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

नवी दिल्लीतील एलपीजीची किंमत

घरगुती गॅस सिलिंडर - ९१३ रुपये (१४.२ किलो)

व्यावसायिक गॅस सिलिंडर - २०७८.५० रुपये (१९ किलो)

मुंबईतील एलपीजी गॅसची किंमत

घरगुती गॅस सिलिंडर - ९१२.५० रुपये

व्यावसायिक गॅस सिलिंडर - २०३१ रुपये

चेन्नई एलपीजी गॅसची किंमत

घरगुती गॅस सिलिंडर - ९२८.५० रुपये

व्यावसायिक गॅस सिलिंडर - २,२४६.५० रुपये

कोलकातामधील एलपीजी किंमत

घरगुती गॅस सिलिंडर - ९३९ रुपये

व्यावसायिक गॅस सिलिंडर - २,२०८.५० रुपये

पटनामधील एलपीजी गॅसची किंमत

घरगुती गॅस सिलिंडर - १००२.५० रुपये

व्यावसायिक गॅस सिलिंडर - २,३५३.५० रुपये

LPG Rate
LPG Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ, ४ महिन्यात ₹५०० ने महागला

सरकारच्या दाव्यानुसार, एलपीजी गॅस पुरवठा पूर्वपदावर आला आहे. देशातील कोणत्याही भागात गॅसच्या पुरवठ्यात तुटवडा नाही. व्यावयायिक गॅस पुरवठ्यापैकी ७० टक्के पुरवठा पूर्ववत करण्यात आलाय. तसेच ऑटो एलपीजीची मागणी वाढली आहे. फेब्रुवारीत दररोज १७७ टन वापर होता. आता आकडा दररोज सुमारे ३५० टनांपर्यंत वाढलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com