LPG Supply: युद्धबंदीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG सिलिंडर वितरणाचा नवीन फॉर्म्युला तयार; कुणाला होणार फायदा?

Central Government Big Decision on LPG Supply: इराण-अमेरिका युद्ध थांबल्यानंतर एलपीजी गॅस वितरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपन्यांच्या गॅस पुरवठ्याच्या वितरणामध्ये बदल केला आहे.
LPG Price Hike
LPG Price HikeSaam Tv
Published On
Summary

इराण-अमेरिका युद्ध थांबल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय

एलपीजी वितरणामध्ये केला महत्त्वाचा बदल

नॉन डॉमेस्टिक एलपीजी पुरवठ्यात केला बदल

इराण-अमेरिकेच्या सीजफायरच्या निर्णयानंतर अनेक बदल झाले. केंद्र सरकारने एलपीजीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सरकारने एलपीजी सप्लायसाठी नवीन फॉर्म्युला तयार केला आहे. यामुळे एलपीजी वितरणामध्ये महत्त्वाचा बदल होणार आहे.

LPG Price Hike
LPG Gas Cylinder : आता रांगेत उभे राहायची गरज नाही ; घरबसल्या ५ मिनिटांत करा एलपीजी कनेक्शन बंद, पैसेही परत मिळतील

सरकारच्या या निर्णयामुळे औषध उद्योगापासून ते पोलाद उद्योगांच्या कारखान्यांना दिलासा मिळणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या प्रणालातील एलपीजी पुरवठ्याबाबत अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. राज्यांना पॅकेज्ड नॉन डॉमेस्टिक एलपीजीच्या ७० टक्के देण्यात आला आहे. यामध्ये नैसर्गिक वायू पुरवठ्याबाबत सुधारणा करणाऱ्या राज्यांना १० टक्के कोटा उपलब्ध करुन दिला जाईल. पाईपद्वारे पीएनजी म्हणजेच नैसर्गिक वायू पुरवठ्याचा विस्तार करणाऱ्या राज्यांना अघिक गॅस मिळणार आहे.

एलपीजीच्या वापरापैकी ७० टक्के पुरवठा केला जाईल

सरकारने औषधनिर्माण, अन्न, पॉलिमर, कृषी, पॅकेजिंग, कलर, युरेनियम, पोलाद, बियाणे, धातून, सिलॅमिक्स या क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात एलपीजी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्योगांना मार्च २०२६ पूर्वी एकूण वापराच्या ७० टक्के पुरवठा केला जाईल.

LPG Price Hike
LPG Cylinder: LPG च्या नियमात मोठा बदल, फक्त 'हे' कागदपत्र दाखवून मिळवा गॅस सिलिंडर; सर्वसामान्यांना दिलासा

केंद्र सरकारने काय सूचना दिल्या?

केंद्र सरकारने नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादने वितरणाबाबत आदेश दिले आहे. संबंधित विभागांना गॅसचे वितरण करा, असं सांगितलं आहे. तसेच सुधारणा करणाऱ्या राज्यांना १० टक्के एलपीजीचा लाभ लवकरात लवकर द्यावा. बायोगॅस (CBG) संबंधित राज्य धोरण लवकरच अधिसूचित करा, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे.

LPG Price Hike
LPG Booking Rules: एलपीजी गॅस बुकिंगच्या नियमात बदल, आजच करा हे काम, अन्यथा सिलेंडर मिळणार नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com