LPG Booking Rules: एलपीजी गॅस बुकिंगच्या नियमात बदल, आजच करा हे काम, अन्यथा सिलेंडर मिळणार नाही

LPG Gas Cylinder Booking Rules Change: एलपीजी गॅस बुकिंगच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. आता गॅस बुकिंगआधी आधार केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर सिलेंडर मिळणार नाही.
LPG Booking Rules
LPG Booking Rulessaam tv
Published On
Summary

एलपीजी गॅस बुकिंगच्या नियमात बदल

हे काम लगेच करा

अन्यथा मिळणार नाही सिलेंडर

एलपीजी गॅस सिलेंडरच्या नियमात अनेक बदल करण्याक आले आहे. एलपीजी गॅस बुक करताना तुम्हाला या नियमांचे पालन करायचे करायचे आहे. जर तुम्ही गॅस बुक करत असाल तर या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात. गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी आता ईकेवायसी अनिवार्य केले आहे.

LPG Booking Rules
LPG Gas Cylinder : आता रांगेत उभे राहायची गरज नाही ; घरबसल्या ५ मिनिटांत करा एलपीजी कनेक्शन बंद, पैसेही परत मिळतील

सरकारने एलपीजी गॅसधारकांसाठी आधार बायोमेट्रिक ईकेवायसी अनिवार्य केले आहे. आता हे नियम सर्व गॅस कनेक्शनसाठी लागू करण्यात आले आहे. जर तुम्ही ईकेवायसी केली नाही तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही. बुकिंगच होणार नाही.

सरकार आणि तेल कंपन्यांचे म्हणणे आहे की, बोगस कनेक्शन आणि चुकीच्या पद्धतीने गॅस बुकिंगला आळा घालण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक कनेक्शन घेतले आहेत. चुकीच्या मार्गाने एलपीजी गॅस बुकिंग केले जात आहेत. त्यामुळेच आता Indane, Bharat Gas आणि HP Gas ने आधार केवायसी अनिवार्य केले आहे.

आधार केवायसी कशी करायची? (LPG Gas Booking Aadhaar KYC)

एलपीजी गॅस बुकिंगसाठी आधार केवायसी करणे खूप सोपे आहे. तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरकाकडे जाऊन केवायसी करायची आहे. तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल. यानंतर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केले जाईल. तुम्ही ऑनलाइन मोबाइल अॅपद्वारेदेखील केवायसी करु शकतात. तुम्हाला ही प्रोसेस एकदाच करायची आहे.

LPG Booking Rules
LPG Cylinder: LPG च्या नियमात मोठा बदल, फक्त 'हे' कागदपत्र दाखवून मिळवा गॅस सिलिंडर; सर्वसामान्यांना दिलासा

Indane Gas साठी आधार केवायसी कशी करायची?

सर्वात आधी Indane Gas च्या वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर लॉग इन करा. त्यानंतर अपडेट केवायसी करा. तिथे आधार लिकिंग ऑप्शन दिसेल. त्यानंतर आधार नंबर टाकून ओटीपीद्वारे वेरिफाय करा. यानंतर तुम्हाला जवळच्या वितरण केंद्रात जाऊन फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन करायचे आहे.

LPG Booking Rules
LPG गॅस सिलिंडरचे नियम बदलले, १ जुलैपर्यंत हे काम कराच अन्यथा बुकिंग नाही, PNG आता अनिवार्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com