Pandharpur News : करमाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील परिक्षण भूमापक कर्मचा-यास दाेन हजार पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. खंडू रेंवडे असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असल्याची माहिती एसीबी कार्यालयातून मिळाली. (Maharashtra News)
तक्रारदाराने त्याच्या मोरवड (ता .करमाळा) हद्दीतील जमिनीची मोजणी करून हद्दी निश्चित करणे व हद्दी निश्चित केल्यानंतर त्याची नकाशा प्रिंट काढणे यासाठी तातडीच्या मोजणीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी आवश्यक असलेली शासकीय तीन हजार रुपये शुल्क चलनाद्वारे भरण्यात आले हाेते.
दरम्यान हे काम करुन देण्यासाठी खंडू रेंवडे याने तीन हजार रुपयांची मागणी केली असता. तडजोडी अंती 2500 रुपये घेताना त्याला एसीबीने साेमवारी पकडले. त्याच्यावर करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.