Dhule Crime : दुहेरी हत्याकांडानं धुळे हादरलं! बायकोसमोर अपमान केला म्हणून मुलानं आई-वडिलांची केली हत्या

Dhule Crime News : बायकोच्या समोर अपमानास्पद बोलले म्हणून मुलानेच आई आणि वडिलांची हत्या केली. धुळे येथील शिरपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली.
Dhule Crime News
Dhule Crime NewsSaam tv
Published On

दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं धुळ्यातील शिरपूर हादरले. पोटच्या मुलानंच आई आणि वडिलांची हत्या केली. बायकोसमोर अपमानास्पद बोलल्याला राग मनात धरून त्यानं आई-वडिलांच्या डोक्यात मुसळचे प्रहार केले. यात दोघांचाही मृत्यू झाला. दोघांच्या हत्येनंतर आरोपी मुलगा घटनास्थळावरून फरार होण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी शेजारील नागरिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

धुळ्यातील शिरपूर येथील महावीर सोसायटी येथे आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. मुलीचे लग्न आटोपून आई-वडील आजच घरी परतले होते. पत्नीसमोर ते अपमानास्पद बोलले म्हणून त्याचा राग आला. त्याच रागातून त्याने आई आणि वडिलांच्या डोक्यात मुसळने प्रहार केले. यात ते दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

आई-वडिलांची हत्या करून आरोपी मुलगा फरार होण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी शेजारील नागरिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोटच्या मुलानेच आई-वडिलांचा जीव घेतल्याने शिरपूर शहर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नसल्याचे दिसून आले.

Dhule Crime News
Nashik : नाशिक हादरलं! पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com