Uddhav Thackeray latest news : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला असून ठाकरे पुन्हा एकदा फुटला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह शिवसेना (UBT) गटातील ६ बंडखोर खासदार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. indiatoday ने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी ३ वाजता हा हाय-व्होल्टेज पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. ठाकरेंच्या ९ खासदारांपैकी ६ खासदारांनी साथ सोडल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (यूबीटी) सर्व ६ बंडखोर खासदार सोमवारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार आहे. यामुळे पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्रता टाळण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वपूर्ण दोन-तृतीयांश संख्याबळ बंडखोर गटाला मिळेल.
indiatoday ने दिलेल्या वृत्तानुसार शिवसेनेचे (यूबीटी) सर्व सहा बंडखोर लोकसभा खासदार सोमवारी दुपारी ३ वाजता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता आहे.
ओमराजेंसह सहा खासदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत औपचारिकपणे विलीन होणार आहेत. त्यामुळे या बंडखोर गटाला पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्रता टाळण्यासाठी आवश्यक असलेले दोन-तृतीयांश संख्याबळ मिळाले आहे. 'ऑपरेशन टायगर'मुळे निर्माण झालेल्या राजकीय गदारोळामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज दुपारी २.३० वाजता नरिमन पॉईंट येथील शिवालय या पक्ष कार्यालयात सर्व आमदारांची आणि विधान परिषद सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
आज राज्यात विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्याशिवाय आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ठाकरेंनी आमदारांची बैठक बोलवली आहे. पक्षांतराच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष एकसंध ठेवण्याचा केलेला प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. ६ खासदारांनी साथ सोडल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सर्व आमदारांना संबोधित करून पक्षाची रणनीती स्पष्ट करतील.
ओमराजे निंबाळकर आणि नागेश पाटील आष्टीकर या २ बंडखोर खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले.
१७ जून रोजी दिल्लीत झालेल्या शिवसेना (यूबीटी) संसदीय पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या सहा खासदारांमध्ये संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील-आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. शिवसेनेचे (यूबीटी) सध्या ९ लोकसभा खासदार आहेत, त्यामुळे बंडखोर गटाला दोन-तृतीयांश बहुमताचा टप्पा गाठण्यासाठी कमीतकमी ६ सदस्यांची आवश्यकता आहे.
१८ जूननंतर ठाकरे गटाकडून आमच्याविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे आम्ही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. "मी आणि (शिवसेना-यूबीटीचे) काही इतर खासदारांनी १८ जूनपर्यंत कोणताही निर्णय घेतला नव्हता. आम्ही कुठेही गेलो नव्हतो. मात्र, गुरुवारपासून आमच्या विरोधात काही टीका-टिप्पणी करण्यात आल्या. त्यामुळे आम्हाला ठाकरेंसोबत थांबण्यात काही अर्थ नाही," असे आष्टीकर म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.