६ खासदार शिंदेंसेनेत जाणार? समजताच उद्धव ठाकरेंनी उचलले मोठं पाऊल, दिल्लीत टाकला डाव, थेट 'हा' कायदा वापरणार

Uddhav Thackeray, Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या संभाव्य बंडखोरीच्या चर्चांदरम्यान पक्षाने सर्व खासदारांना व्हीप जारी केला आहे. दिल्लीत तातडीची बैठक बोलावण्यात आली असून पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
uddhav thackeray news
uddhav thackeray Saam tv
Published On

Uddhav Thackeray Sena whip issued to MPs : ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात (शिवसेना) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ६ खासदार १९ जून रोजी पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून तातडीने 'डॅमेज कंट्रोल' आणि कायदेशीर हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्ष फुटी रोखण्यासाठी ठाकरे सेनेने नवी दिल्ली येथे सर्व खासदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सर्व खासदारांना अधिकृत 'व्हीप' (पक्षादेश) जारी केला आहे.

कायदेशीर कोंडी करण्याचा प्रयत्न

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वकिलांसोबत चर्चा करून कायदेशीर रणनीती आखली होती. त्यानंतर संसदेतील मुख्य गटनेते अरविंद सावंत आणि प्रतोत यांच्या माध्यमातून हा व्हीप जारी करण्यात आला आहे. पक्ष सोडू इच्छिणाऱ्या खासदारांना कायदेशीर कचाट्यात पकडणे आणि त्यांची कोंडी करणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

uddhav thackeray news
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे ६ खासदार फोडले कसे? कोणाला काय मिळणार? सगळं काही आले समोर

व्हीपचे उल्लंघन केल्यास कारवाई:

पक्षाने जारी केलेल्या या व्हीपनुसार सर्व खासदारांना दिल्लीतील बैठकीला हजर राहणे बंधनकारक आहे. जर एखादा खासदार या बैठकीला गैरहजर राहिला किंवा त्यांनी पक्षादेश मानला नाही, तर '१० व्या अनुसूचीनुसार' (Anti-Defection Law / पक्षांतर बंदी कायदा) त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ५ खासदार केवळ ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. त्यामुळे आता उद्या दिल्लीत होणाऱ्या या प्रत्यक्ष बैठकीला नेमके कोणते खासदार उपस्थित राहतात आणि कोण दांडी मारते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

अरविंद सावंतांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील ६ खासदार बंडखोरी करून स्वतंत्र गटाची मागणी करण्याच्या तयारीत असतानाच, ठाकरे गटाने याला रोखण्यासाठी तातडीने कायदेशीर पावले उचलली आहेत. ठाकरे सेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक अधिकृत पत्र पाठवले. कोणत्याही फुटीर गटाला परस्पर मान्यता न देण्याची विनंती पत्राद्वारे केली.

लोकसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हाच मुख्य आणि अधिकृत राजकीय पक्ष आहे. जर कोणताही कथित फुटीर गट स्वतंत्र मान्यतेसाठी किंवा विशेष दर्जासाठी अध्यक्षांकडे आला, तर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत पक्ष नेतृत्वाला त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी. फुटीर गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देऊ नये, तसेच त्यांना संसदेत कोणत्याही विशेष सवलती किंवा सुविधा दिल्या जाऊ नयेत.

uddhav thackeray news
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे ६ खासदार फोडले कसे? कोणाला काय मिळणार? सगळं काही आले समोर

बंडखोर खासदारांच्या हालचाली:

ठाकरे सेनेचे ६ बंडखोर खासदार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन 'आम्ही पक्षातून वेगळे होत असून आम्हाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी' असे पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी सकाळी ११ वाजता लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली असून पक्ष फुटी रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com