अंगावर काटा आणणारा अपघात! २५१ kmph वेगातील BMW चा चुराडा; हायवेवर मृतदेहांचे अवयव विखुरले

Badlapur BMW Crash: बदलापूरजवळ जेएनपीटी हायवेवर भरधाव बीएमडब्ल्यू कारचा भीषण अपघात झाला. दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक मुलगी गंभीर जखमी आहे.
Badlapur BMW Car Accident News
Badlapur BMW Car Accident NewsSaam TV marathi
Published On

Badlapur BMW Car Accident News : बदलापुरात मुंबई-वडोदरा हायवेवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बीएमडब्ल्यू (BMW) कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. काल रात्रीच्या सुमारास ही बीएमडब्ल्यू कार टिटवाळ्याच्या दिशेकडून बदलापूरकडे येत होती. एरंजाडजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही कार दुभाजकावर (डिव्हायडर) आदळून पलटी झाली.

हा अपघात इतका भीषण होता की, मृतदेहांचे अवयव अर्धा किलोमीटरपर्यंत विखुरले गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मरण पावलेल्या व्यक्ती बदलापूर येथीलच असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मध्यरात्री २ वाजता काळ आला!

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घडला. हायवेवरून जात असताना मध्यरात्रीच्या अंधारात रस्त्याचा आणि वेगाचा अंदाज न आल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अलिशान BMW कार थेट डिव्हायडरला जाऊन धडकली. ही धडक इतकी भयानक होती की, संपूर्ण परिसरात मोठा आवाज झाला. BMW चा चुराडा झाला.

Badlapur BMW Car Accident News
Maharashtra Weather : मोठी बातमी! पुढील ३ दिवसांत पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

स्पीडोमीटर २५१ वर; गाडीचा थरारक चुराडा

सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अपघातापूर्वी गाडीचा वेग ताशी तब्बल २५१ किलोमीटर असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावरून गाडीचा वेग किती मर्यादेबाहेर होता, याचा अंदाज येतो.

अपघात इतका भीषण होता की, महागड्या आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या BMW कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. गाडीच्या इंजिनचे तुकडे-तुकडे झाले असून, हायवेवर जिकडे तिकडे गाडीचे अवशेष विखुरलेले पाहायला मिळत आहेत. घटनास्थळावरील कारची अवस्था आणि विदारक दृश्ये पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

Badlapur BMW Car Accident News
ऑपरेशन टायगर हाणून पाडण्यासाठी ठाकरेंचा शेवटचा डाव, २ आमदार अचानक ओमराजेंच्या घरी दाखल; मध्यरात्री काय घडलं?

दोन जण ठार, मुलगी गंभीर जखमी

या भीषण अपघातामध्ये कारमधील एका पुरुषाचा आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीत असलेली एक मुलगी या अपघातात गंभीररीत्या जखमी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी मुलीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Badlapur BMW Car Accident News
धक्कादायक! व्यायाम करताना पोलीस कर्मचाऱ्याला जिममध्ये हार्ट अटॅक; जागेवरच दुर्दैवी मृत्यू, थरारक व्हिडीओ समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com