Maharashtra Weather : मोठी बातमी! पुढील ३ दिवसांत पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

Monsoon Forecast, IMD Rain Alert : महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर पुणे, कोकण आणि इतर भागांत मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
MAHARASHTRA WEATHER UPDATE: HEATWAVE CONTINUES, RAIN ALERT ISSUED ACROSS STATE
MAHARASHTRA WEATHER UPDATE: HEATWAVE CONTINUES, RAIN ALERT ISSUED ACROSS STATESaam Tv
Published On

Maharashtra monsoon latest update today : मान्सून पुढे सरकण्यास राज्यात पोषक वातावरण तयार होत आहे. पुढील ३ दिवसांत राज्यात पुन्हा मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. चक्राकार वाऱ्यामुळे मान्सूनचा प्रवास रखडला होता. पण आठवडाभरात मान्सून पुर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. मान्सूनसाठी राज्यात पोषक वातावरण तयार होत असतानाच काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसाने पाठ फिरवल्याने राज्यभरात उन्हाचा चटका वाढलाय. आज विदर्भात उष्ण लाटेची आणि वादळी पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. आज सोलापूर, पु्ण्यासह कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

MAHARASHTRA WEATHER UPDATE: HEATWAVE CONTINUES, RAIN ALERT ISSUED ACROSS STATE
ऑपरेशन टायर हाणून पाडण्यासाठी ठाकरेंचा शेवटचा डाव, २ आमदार अचानक ओमराजेंच्या घरी दाखल; मध्यरात्री काय घडलं?

अकोला, वाशीम, अमरावती या जिल्ह्यांत आज उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत उष्ण हवामानासह वादळी पावसाचा अंदाज आहे. त्यामुले या ठिकाणांनी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, तसेच तुरळक विजांसह पावसाची शक्यता आहे.

MAHARASHTRA WEATHER UPDATE: HEATWAVE CONTINUES, RAIN ALERT ISSUED ACROSS STATE
Today Horoscope : 'या' ४ राशींना आज नोकरी-व्यवसायात मिळणार गुड न्यूज; वाचा तुमचे राशिभविष्य

पुण्यात आज पावसाची शक्यता -

पुढील तीन ते चार दिवसांत पुण्यासह राज्यभरात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना शनिवारी मोठा दिलासा मिळेल. सातत्याने वाढ होत असलेल्या कमाल तापमानात लक्षणीय घट नोंदविण्यात आली. त्यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

MAHARASHTRA WEATHER UPDATE: HEATWAVE CONTINUES, RAIN ALERT ISSUED ACROSS STATE
६ मतदारसंघ, एकच लक्ष्य; बंडखोरांविरोधात ठाकरेंची मोहीम, संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक आले समोर

पुणे शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या आठवड्यापासून कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. परिणामी उन्हाचा चटका वाढला होता. उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. शनिवारी वातावरणात बदल होऊन कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसची घट नोंदविण्यात आली.

आज कुठे कसे असेल हवामान?

उष्ण लाट व वादळी पावसाची शक्यता. (ऑरेंज अलर्ट) - अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

उष्ण हवामानाची शक्यता. (येलो अलर्ट) - पालघर.

वादळी पावसाचा इशारा. (येलो अलर्ट) - सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर.

MAHARASHTRA WEATHER UPDATE: HEATWAVE CONTINUES, RAIN ALERT ISSUED ACROSS STATE
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल विरोधात लागला; ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, शिंदेंच्या शिवसेनेत जाणार की नाही केलं स्पष्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com