Today Horoscope : 'या' ४ राशींना आज नोकरी-व्यवसायात मिळणार गुड न्यूज; वाचा तुमचे राशिभविष्य

today horoscope for all zodiac signs : जाणून घ्या आजचे राशिभविष्य... नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनाबाबत १२ राशींसाठी काय संकेत आहेत? कोणत्या ४ राशींना आज गुड न्यूज मिळणार..
Daily Horoscope in Marathi
Daily Horoscope in MarathiAI
Published On

मेष (Aries): आज कामात पूर्ण मन लागणार नाही आणि वेग मंदावेल. वडिलांशी वाद घालणे टाळा, त्यांचा सल्ला ऐकणे फायद्याचे ठरेल. ऑफिसमध्ये बॉसकडून चांगली मदत मिळेल. व्यापारात बदलांचे विचार मनात येतील, जे भविष्यात फायदेशीर ठरतील.

वृषभ (Taurus): दिवसाची सुरुवात आव्हानात्मक असू शकते. लोक तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही ध्येयावर ठाम राहा. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील आणि मुलांसाठी एखादा सरप्राइज प्लॅन करू शकता.

मिथुन (Gemini): आज आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे; जुने किंवा अडकलेले पैसे परत मिळू शकतात. बोलण्यावर संयम ठेवा, कोणाचे मन दुखवू नका. नवीन संपर्कांचा भविष्यात फायदा होईल. कुटुंबात आनंदाची बातमी मिळेल आणि नवीन योजना आखता येतील.

कर्क (Cancer): आजचा दिवस थोडा गोंधळाचा राहील. मुलांच्या संगतीवर आणि हालचालींवर बारीक लक्ष ठेवा. कामासाठी इतरांवर जास्त अवलंबून राहू नका. मालमत्ता किंवा वाटणीच्या वादात विचारपूर्वक बोला, नाहीतर वाद वाढू शकतो.

सिंह (Leo): आजचा दिवस यश आणि आत्मविश्वास देणारा आहे. रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागतील. मुलांच्या भविष्यासाठी मोठा निर्णय घेऊ शकता. जोडीदाराला दिलेले वचन पूर्ण करा आणि कर्ज घेणे टाळा.

कन्या (Virgo): समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या गोड बोलण्याने लोक प्रभावित होतील, पण विनाकारण चिंता करणे टाळा. घरातील मोठ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. विद्यार्थ्यांना मानसिक तणावाततून आराम मिळेल.

Daily Horoscope in Marathi
Today Horoscope : 'या' राशींवर धनाचा वर्षाव होणार, तर कोणाला नशिबाची मिळणार साथ? पाहा आज तुमच्या भाग्यात काय

तुला (Libra): आज काहीतरी नवीन करण्याची इच्छा होईल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. मुलांच्या करिअरची चिंता दूर होईल. ऑफिसमधील महत्त्वाच्या गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. वाहन चालवताना काळजी घ्या आणि विरोधकांपासून सावध राहा.

वृश्चिक (Scorpio): आज कामाचा ताण जास्त राहील आणि अपेक्षेप्रमाणे फळ न मिळाल्याने अस्वस्थता जाणवेल. देवाधर्मात आणि अध्यात्मात मन रमल्याने शांतता लाभेल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. भावंडांचे सहकार्य आणि वडिलांचा सल्ला मोलाचा ठरेल.

धनु (Sagittarius): प्रत्येक काम विचारपूर्वक करा. मालमत्तेशी संबंधित एखादी समस्या निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात निष्काळजीपणा करू नये. आरोग्याची काळजी घ्या. घरातील लहान मुलांच्या हट्टापायी खर्च करावा लागू शकतो.

Daily Horoscope in Marathi
Today Horoscope : वृषभसह 'या' ३ राशींना नशिबाची साथ; शनिवार ठरणार आनंदाचा, प्रत्येक कामात मिळणार यश

मकर (Capricorn): नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कौटुंबिक नातेसंबंध घट्ट होतील. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रातील लोकांनी सावध राहावे. इतरांचे वाहन चालवणे टाळा, कायदेशीर अडचणी येऊ शकतात. कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत.

कुंभ (Aquarius): आज कमाई आणि खर्च यांचा ताळमेळ बसवणे गरजेचे आहे. दिखाव्यापोटी जास्त खर्च करू नका. घराईघाईने निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील.

मीन (Pisces): आजचा दिवस संमिश्र राहील. आरोग्य उत्तम राहील, पण पैशांच्या देवाणघेवाणीत सावधगिरी बाळगा. कुटुंबासोबत आनंदात वेळ जाईल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील.

Daily Horoscope in Marathi
Today Horoscope : वृश्चिक राशीसाठी तिप्पट लाभाचा महासंयोग, मकर-मीन राशीत प्रेमाचा वर्षाव; जाणून घ्या तुमचे भविष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com