धक्कादायक! व्यायाम करताना पोलीस कर्मचाऱ्याला जिममध्ये हार्ट अटॅक; जागेवरच दुर्दैवी मृत्यू, थरारक व्हिडीओ समोर

Heart Attack, Gym Death : उत्तराखंडमधील पोलीस कर्मचारी गिरीश भट्ट यांचा जिममध्ये व्यायाम करताना संशयित हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Heart Attack, Gym Death
Heart Attack, Gym Death
Published On

जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊन मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. अशीच एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना पुन्हा एकदा समोर आली असून, यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा जिममध्ये वर्कआऊट करताना जागेवरच मृत्यू झाला. व्यायाम करत असताना अचानक छातीत कळा आल्याने हा पोलीस कर्मचारी जमिनीवर कोसळला. ही संपूर्ण थरारक घटना जिममधील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जिममध्ये व्यायाम करत असताना उत्तराखंड पोलिसात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल आणि एसओजी जवानाचा मृत्यू झाला. जिममध्ये कोसळल्यानंतर उपस्थित असणाऱ्यांनी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जिममध्ये व्यायाम करत असताना कोसळताना पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

Heart Attack, Gym Death
Operation Tiger : ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार? आदित्य ठाकरेंच्या विधानाने राजकीय खळबळ

हार्टअटॅकने मृत्यू झालेल्या जवानाचे नाव गिरीश भट्ट असे आहे. ते मूळचे पिथोरगडचे असून सध्या भजनपूर गावात राहत होते. मागील तीन वर्षांपासून गिरीश जिममध्ये व्यायाम करत होते. पण शुक्रवारी दुपारी आक्रीत घडले. नेहमीप्रमाणे ते जिममध्ये आले होते. व्यायाम करायला सुरूवात केली होती. पण व्यायाम करत असताना त्याची प्रकृती अचानक खालावली आणि ते कोसळले.

Heart Attack, Gym Death
Maharashtra Weather : मोठी बातमी! पुढील ३ दिवसांत पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

पोलीस कोसळल्याचे पाहिल्यानंतर जिममध्ये उपस्थित असलेल्या इतरांनी त्याला उधम सिंग नगरमधील खातिमा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या मते, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. गिरीश भट्ट यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या कुटुंबियांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. गिरीश भट्ट यांची पत्नी गृहिणी असून त्यांचे दोन मुलं शिक्षण घेत आहेत.

Heart Attack, Gym Death
ऑपरेशन टायगर हाणून पाडण्यासाठी ठाकरेंचा शेवटचा डाव, २ आमदार अचानक ओमराजेंच्या घरी दाखल; मध्यरात्री काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com