Manoj Jarange Patil: कॅबिनेटमध्ये मनोज जरांगेंविरोधात नाराजीचा सूर; भाजपचे मंत्री आक्रमक

Maratha Reservation Row: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळात त्यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त झाल्याचे वृत्त आहे. मुंबईतील प्रस्तावित आंदोलनामुळे सरकार आणि जरांगे यांच्यातील संघर्षाकडे लक्ष लागले आहे.
Maratha Reservation Row
Maharashtra cabinet meeting on Manoj Jarange Maratha reservation protestsaam tv
Published On
Summary
  • मुंबईतील प्रस्तावित आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी नाकारण्यात आल्याचे वृत्त

  • मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी

  • जरांगे यांच्या काही वक्तव्यांवर मंत्र्यांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त

मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या लढाईत सरकार आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. कारण कॅबिनेटच्या बैठकीत सर्व मंत्र्यांनी एकमतानं एक रणनीती आखलीय. नेमकी काय आहे ही रणनीती? भाजपचे मंत्री जरांगेविरोधात का अचानक आक्रमक झाले आहेत? पाहूयात हा रिपोर्ट.

मनोज जरांगेंनी कुणबी दाखल्यांच्या मागणीसाठी थेट आरपारच्या लढाई सुरू केलीय. मात्र त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करताना वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे सरकारमध्ये तीव्र नाराजी पसरलीय. त्याचेच पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले. जरांगेंच्या भाषेवरून महायुतीतील सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केलीये. सरकार जरांगेंचे लाड पुरवत असून आता थेट भूमिका घेण्याची वेळ आल्याचा घरचा आहेर अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळांनी सरकारला दिलाय.

Maratha Reservation Row
जरांगेंच्या आंदोलनादरम्यान सरकारचा मोठा निर्णय; 3 जातींचा ओबीसींमध्ये समावेश

तर दुसरीकडे मुंबईतल्या आंदोलनाच्या मुद्यावरून जरांगेंना आवाहन करण्य़ाऐवजी भाजप मंत्र्यांनी तर आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर उघडपणे टीका केलीय.

खरंतर, सुरूवातीला जरांगेंच्या आक्रमक पवित्र्यासमोर सरकार बॅकफूटवर गेल्याचं दिसलं होतं. मात्र, आता सर्वच मंत्र्यांनी जरांगेंच्या भाषेमुळे नाराजी व्यक्त केल्यामुळे आता सरकारही आक्रमक भूमिका घेण्याची चिन्ह आहेत. मात्र यामुळे तिढा सुटणार की संघर्ष आणखी वाढणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

Maratha Reservation Row
...तर OBC साठी स्वतंत्र पक्ष काढणार; बड्या नेत्याचा सरकारला इशारा, पडळकरांवरही हल्लाबोल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com