

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारवर टीका केली
सरकारी निर्णयांमुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम होण्याची चिंता हाके यांनी व्यक्त केली
स्वतंत्र ओबीसी पक्षाबाबत सध्या हाके यांचा इशारा
आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राज्यातील वातावरण तापलय. एकीकडे मराठा दूसरीकडे ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावं यासाठी ओबीसी नेत्यानी आक्रमक भूमिका घेतलीय. त्याच वेळी धनगर समाजाने st प्रवर्गातून आरक्षण मिळवावं म्हणून एल्गार केलाय. त्यामुळे सरकार कोंडीत सापडलंय. चहुबाजूने कोंडीत सापडलेल्या सरकारच अजून टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. समाजाचे प्रश्न सुटत नसल्याने एका बड्या नेत्याने थेट नवा पक्ष स्थापन करण्याचा इशारा दिलाय.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ओबीसींचे आरक्षण हिरावून घेतले जात आहेत. “ओबीसींचे आरक्षण संपले आहे, हा माझा दावा आहे,” असे हाके म्हणाले. लक्ष्मण हाके हे सांगलीमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.
या परिषदेत त्यांनी ओबीसी नेत्यावर आगपाखड केली. ओबीसीचे नेतेही या प्रश्नावर मूग गिळून बसलेत. खासदार विशाल पाटील यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिलाय. त्यातून मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवल्याचे हाके म्हणाले. सध्या मराठा समाजात कोणते आरक्षण स्वीकारायचे, यावरून संभ्रम निर्माण झाला असल्याचा दावाही हाकेंनी केलाय.
“मंत्र्यांनी जरांगे पाटील यांची वारंवार भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाचे बळ वाढवले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड करून ठेवलाय, असा आरोपही हाकेंनी केलाय. महाराष्ट्रात संविधानविरोधी भूमिका घेतल्या जात आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका करताना हाके यांनी,जरांगे तुमचा लढा मराठा समाजातील गोरगरीब लेकरांसाठी आहे. मात्र, ओबीसींच्या लेकराबाळांचा बळी देऊन तुम्हाला हा लढा जिंकायचा आहे का?” असा प्रश्नही त्यांनी केलाय.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेवरही हाके यांनी शंका उपस्थित केलीय. “पडळकर हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. सत्ताधारी आमदार आंदोलन कसे करू शकतात? ते मुख्यमंत्र्यांच्या किचन कॅबिनेटमधील आमदार आहेत,” अशी टीका त्यांनी केली. धनगर समाजाचा ओबीसी प्रवर्गातील समावेश. आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर समाजानेच भूमिका घेण्याची जबाबदारी आहे. ओबीसी समाज एकत्र आला, तर अनेकांचे डिपॉझिट जप्त होईल. वेळ पडली तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू,” असा इशाराही त्यांनी दिलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.