Maharashtra Weather Update: राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून येलो अलर्ट

Maharashtra Weather Alert: भारतीय हवामान विभागाने राज्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी केला आहे. सांगली आणि मिरजच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने आधीच हजेरी लावली आहे.
Maharashtra Weather Alert:
Maharashtra weather update rain and thunderstorm yellow alert IMDsaam tv
Published On
Summary
  • हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

  • विदर्भ आणि मराठवाडा भागात उष्णतेचा प्रभाव अधिक आहे.

  • राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील उष्णतेची लाट काहीशी ओसरली आहे. उकाडा तापदायक ठरत आहे. अनेक शहरांमध्ये कमाल तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले आहे. मंगळवारी नोंदवण्यात आलेल्या अंदाजानुसार, विदर्भ आणि मराठवाडा भागात उष्णतेचा प्रभाव अधिक दिसून आला आहे. तर संध्याकाळी राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. सांगली शहरासह मिरज तालुक्यात गारपीट झाली.

Maharashtra Weather Alert:
Rain Alert : महाराष्ट्रात कुठे उन्हाचा कडाका, तर कुठे धो धो पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज

सांगली जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बुधवारी राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील.

याभागात मेघगर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान विभागाने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका, उकाडा कायम राहून विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Maharashtra Weather Alert:
Rain Alert : ऐन सणासुदीच्या तोंडावर धो धो पाऊस कोसळणार; ११ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा

धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कदेर परिसरात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. काढणीसाठी तयार असलेले कांदा,ज्वारी आणि गव्हाच्या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

लातूर जिल्ह्यात आज सायंकाळी अवकाळी पाऊस झाला, तर यावेळी वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट देखील झाली आहे. जिल्ह्यातल्या औसा निलंगा लातूर या भागात अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांसह फळबागेच्या देखील मोठं नुकसान झालं आहे. पुढील तीन तासासाठी लातूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com