Rain Alert : ऐन सणासुदीच्या तोंडावर धो धो पाऊस कोसळणार; ११ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा

Maharashtra Today Weather News : राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. १७ ते २० मार्च दरम्यान हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Rain Alert : ऐन सणासुदीच्या तोंडावर धो धो पाऊस कोसळणार; ११ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा
Maharashtra Today Weather Newssaam tv
Published On
Summary
  • १७ ते २० मार्च दरम्यान वादळी पावसाचा इशारा

  • काही ठिकाणी गारपीट आणि जोरदार वारे

  • विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्र प्रभावित

  • शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी सूचना

Maharashtra Today Temprature Weather राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आज दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन, मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. इतर ठिकाणी उन्हाचा कडाका कायम राहणार आहे.

IMD च्या अंदाजानुसार, १७ मार्च रोजी वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता राज्यातील दक्षिण भागांमध्ये राहील. यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांचा समावेश असून प्रामुख्याने तेलंगणा आणि कर्नाटक सीमेजवळील भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे. १८ ते २० मार्च दरम्यान वादळी पावसाची तीव्रता आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

Rain Alert : ऐन सणासुदीच्या तोंडावर धो धो पाऊस कोसळणार; ११ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा
KDMC Politics : ठाकरे सेनेचा धक्कादायक निर्णय! नवनिर्वाचित नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी

या काळात विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते. २१ मार्चपासून राज्यातील हवामान स्थिर होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहणार आहे.

Rain Alert : ऐन सणासुदीच्या तोंडावर धो धो पाऊस कोसळणार; ११ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा
Mumbai : सीएनेच लावला कंपनीला चुना, असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात; मुंबईत नेमकं काय घडलं?

बदलत्या हवामानाचा नागरिकांना मनस्ताप होत आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. काढणीला आलेल्या पिकांची पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांपासून नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com