Mumbai : सीएनेच लावला कंपनीला चुना, असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात; मुंबईत नेमकं काय घडलं?

Mumbai News : मुंबईतील अंधेरी परिसरातील एका लॉजिस्टिक कंपनीला सव्वा दोन कोटी रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा आरोप कंपनीतील सीएवर आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
Mumbai : सीएनेच लावला कंपनीला चुना, असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात; मुंबईत नेमकं काय घडलं?
Mumbai NewsSaam Tv
Published On
Summary
  • अंधेरीतील लॉजिस्टिक कंपनीत आर्थिक फसवणूक प्रकरण उघड

  • कंपनीच्या सीएवर सव्वा दोन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप

  • पैसे स्वतःच्या आणि साथीदारांच्या खात्यात वळवल्याचा आरोप

  • न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

संजय गडदे,मुंबई

एका कंपनीत काम करणाऱ्या सीएने कंपनीला तब्बल सव्वा दोन कोटींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानातून आलेल्या आयात मालाची साठवणूक व वितरण करणाऱ्या एका लॉजिस्टिक कंपनीत कार्यरत असलेल्या चार्टर्ड अकाउंटंटने (सीए) इतर सहकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार केला आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनुसार अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,अहमद अली अहमद शेख असे आरोपीचे नाव असून तो अंधेरीतील ब्लूलाइन लॉजिस्टिक्स अँड वेअरहाऊसिंग एलएलपी या कंपनीत सीए म्हणून कार्यरत होता. कंपनीचे भागीदार मनोहर पेंडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने विश्वासाचा गैरफायदा घेत इतर अधिकाऱ्यांच्या मदतीने आर्थिक गैरव्यवहार केला.

Mumbai : सीएनेच लावला कंपनीला चुना, असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात; मुंबईत नेमकं काय घडलं?
Accident News : दुर्दैवी! थांबलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक, ३ पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

पोलीस तपासात मे. टेक्निकल टेक्नॉलॉजीजला पाठवलेले पैसे आरोपीने स्वतःच्या डिलिपक एक्सप्रेस कंपनीत तसेच आपल्या साथीदारांच्या खात्यात वळविल्याचे निष्पन्न झाले. या फसवणुकीत कंपनीचे विक्री प्रमुख हरीप्रसाद राजन, लेखा व्यवस्थापक करुणा रेडेकर यांच्यासह अन्य काही जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Mumbai : सीएनेच लावला कंपनीला चुना, असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात; मुंबईत नेमकं काय घडलं?
Mumbai : 'बुलाती है मगर जाने का नहीं' पुरुषांना जाळ्यात ओढायच्या, कॅफेत नेऊन भलतंच करायच्या, मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर

दरम्यान, आरोपीने आपल्याविरोधात तीन वर्षांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा करत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र सरकारी वकील सचिन जाधव यांनी आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सर्व बाबींचा विचार करून अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपीचा अर्ज फेटाळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com