Mumbai : 'बुलाती है मगर जाने का नहीं' पुरुषांना जाळ्यात ओढायच्या, कॅफेत नेऊन भलतंच करायच्या, मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर

Mumbai Crime News : मुंबईतील साकीनाका परिसरात डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचे रॅकेट उघड झाले आहे. पोलिसांनी कॅफेवर छापा टाकून तीन महिलांना अटक केली असून कॅफे सील करण्यात आला आहे.
Mumbai : 'बुलाती है मगर जाने का नहीं'  पुरुषांना जाळ्यात ओढायच्या, कॅफेत नेऊन भलतंच करायच्या, मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर
Mumbai Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • मुंबईतील साकीनाका परिसरात डेटिंग अॅप स्कॅम उघड

  • दिल्लीहून आणलेल्या तरुणींच्या मदतीने तरुणांची फसवणूक

  • कॅफेत बोलावून मोठे बिल व धमकी देऊन पैसे उकळले

  • पोलिसांनी छापा टाकून ३ महिलांना अटक व कॅफे सील केला

संजय गडदे, मुंबई

मुंबईत एका हॉटेलमध्ये डेटिंग ॲपचा गैरवापर करत, तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पैसे उकळण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांच्या तत्परतेने या प्रकरणातील साकीनाका-पवई जवळील एका हॉटेलमधील मोठं रॅकेट उध्वस्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतून २५ ते ३० तरुणी मुंबईत आणल्या गेल्या होत्या. या तरुणी डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढायच्या. या तरुणी अॅपवरून चॅटिंग करून तरुणांना भेटायला बोलवायच्या. साकीनाका येथील क्लब कॅफेत हा सर्व प्रकार सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे कॅफेचा मालकही या रॅकेटमध्ये सक्रिय होता.

Mumbai : 'बुलाती है मगर जाने का नहीं'  पुरुषांना जाळ्यात ओढायच्या, कॅफेत नेऊन भलतंच करायच्या, मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर
LPG Cylinder Blast : सिलिंडरच्या भीषण स्फोटात तीन घरे उध्वस्त, दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

तरुणाला कॅफेत आणल्यानंतर मुली त्यांना धमकी द्यायच्या. त्यांना लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्याची भीती दाखवली जात होती. तर अनेकदा मुली ऑर्डर करत त्याचे अव्वाच्या सव्वा बिल व्हायचे. अनेकदा हे बिल २५ ते ५० हजारांहून अधिक व्हायचं. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी सदर कॅफेवर धाड टाकली.

Mumbai : 'बुलाती है मगर जाने का नहीं'  पुरुषांना जाळ्यात ओढायच्या, कॅफेत नेऊन भलतंच करायच्या, मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर
Rain Alert : महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार, ९ जिल्ह्यांना अलर्ट, वाचा पाऊस कुठे धो धो कोसळणार?

छापा टाकला तेव्हा एका पीडित तरुणाला बाऊंसर्सकडून धाक दाखवत पैसे वसुली सुरू होती. याप्रकरणी साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. याशिवाय पोलिसांनी हा कॅफे सील केला आहे. सध्या ३ मुलींना अटक करण्यात आली असून त्यांना खास या रॅकेटसाठी दिल्लीहून आणण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com