Rain Alert : महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार, ९ जिल्ह्यांना अलर्ट, वाचा पाऊस कुठे धो धो कोसळणार?

Maharashtra Today Weather News : राज्यात हवामान सतत बदलताना पाहायला मिळत आहे. अकोल्यात ४१.६°C उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
Rain Alert : महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार, ९ जिल्ह्यांना अलर्ट, वाचा पाऊस कुठे धो धो कोसळणार?
Maharashtra Today Weather NewsSaam Tv
Published On
Summary
  • राज्यात सध्या ऊन आणि पावसाचा लपंडाव

  • अकोला येथे ४१.६°C उच्चांकी तापमानाची नोंद

  • मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा येलो अलर्ट

  • अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम

Maharashtra Today Temprature News राज्यात ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळतो आहे. एकीकडे मुंबई, पुणेसह अनेक जिल्ह्यांना उकाड्याने हैराण केले आहे. तर दुसरीकडे आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. पुढील काही दिवस असेच वातावरण राहणार असून काही ठिकाणी उकाडा असणार आहे. शनिवारी आणि रविवारी म्हणजेच काल कोल्हापूर, साताऱ्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस, गारपिटीने हजेरी लावली.

Rain Alert : महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार, ९ जिल्ह्यांना अलर्ट, वाचा पाऊस कुठे धो धो कोसळणार?
Accident News : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला, यात्रेकरूंची बस दरीत कोसळून भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू

तसेच रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोलासह अमरावती आणि वर्धा येथे उष्णतेची लाट होती. काल अकोला येथे देशातील उच्चांकी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Rain Alert : महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार, ९ जिल्ह्यांना अलर्ट, वाचा पाऊस कुठे धो धो कोसळणार?
Accident News : दुर्दैवी! थांबलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक, ३ पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

मध्य महाराष्ट्रातील जेऊर, मालेगाव, ‎सोलापूर, विदर्भातील वाशीम, ब्रह्मपुरी येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली, तर निफाड येथे नीचांकी १३.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. दरम्यान ऊन पावसाच्या या खेळात नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांच्या पिकांवर देखील परिणाम झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com