Accident News : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला, यात्रेकरूंची बस दरीत कोसळून भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू
Nepal Gorakha Bus Accident 7 Devotes DiesAI

Accident News : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला, यात्रेकरूंची बस दरीत कोसळून भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू

Nepal Gorakha Bus Accident News : नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात भारतीय यात्रेकरूंची मायक्रोबस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Published on
Summary
  • नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात भारतीय यात्रेकरूंच्या बसचा भीषण अपघात

  • दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

  • जखमींना चितवन येथील रुग्णालयात दाखल

  • अपघातानंतर बचावकार्य सुरू असून पोलिसांकडून तपास सुरू

Nepal Gorakha Bus Accident 7 Devotes Dies नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात भारतीय यात्रेकरूंची बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला असून बसमधील इतर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या दुर्घटनेत मृत झालेल्या भाविकांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळच्या सुमारास भारतीय यात्रेकरूंची मायक्रोबस मनकामना मंदिरापासून पश्चिमेकडे तनाहूं जिल्ह्यातील अंबुखैरेनी भागाकडे जात होती. यादरम्यान चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने एका वळणावर यात्रेकरूंची बस दरीत कोसळली.

Accident News : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला, यात्रेकरूंची बस दरीत कोसळून भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू
Beed : महाराष्ट्र हादरला! हातपाय बांधले, तोंडामध्ये कपड्याचा बोळा कोंबला; १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

या दुर्घटनेत बसमधील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ७ जण गंभीर जखमी झाले. गोरखा मुख्य जिल्हा अधिकारी तुलसी बहादूर श्रेष्ठ यांनी सांगितले की, जखमींना उपचारासाठी भरतपूर (चितवन जिल्हा) येथील चितवन वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले असून बचावकार्य अजूनही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Accident News : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला, यात्रेकरूंची बस दरीत कोसळून भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू
Nagpur : गणित चुकलं म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण, शिक्षकांची पालकांनाही धमकी, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक घटना

दरम्यान ७ यात्रेकरूंच्या दुर्दैवी मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नेपाळमध्ये अलिकडच्या काळात रस्ते अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नेपाळ वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०२४ ते २५ या काळात ही संख्या ७,६६९ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com