नागपूरमध्ये शाळेत विद्यार्थिनीला शिक्षकाने मारहाण केली
गणिताच्या प्रश्नाचे उत्तर चुकल्यामुळे बेदम मारहाण
मारहाणीत विद्यार्थिनीच्या हाताला गंभीर दुखापत
चाइल्ड हेल्पलाइनच्या हस्तक्षेपानंतर शिक्षकावर गुन्हा दाखल
पराग ढोबळे, नागपूर
Nagpur ZP School Teacher Beats Girl Over Wrong Answer शाळेत छडीचा आणि शिक्षकांचा धाक असेल, तर मुलांना योग्य शिस्त लागते असे म्हणतात. म्हणजेच काय तर छडी लागे छम छम, विद्या येई गम गम. मात्र या छडीचा अतिरेक झाला, तर एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवावर देखील बेतू शकते. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. गणिताचं उत्तर चुकलं म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण करण्यात आली. यामुळे ती गंभीर जखमी झाली. याप्रकरणी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात देवळी कला येथे ही घटना घडली. पीडित मुलगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाचवीच्या वर्गात शिकते. नेहमीप्रमाणे ती १० मार्च रोजी शाळेत गेली. शाळेत गणिताच्या तासादरम्यान विषय शिक्षकांनी तिला प्रश्न विचारला. तिने उत्तर देखील दिले, मात्र ते उत्तर चुकीचे होते.
शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर चुकले म्हणून संबंधित मुलीला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. इतकचं नाही तर, मारहाणी नंतर शिक्षकाने विद्यार्थिनीच्या पालकांना बोलावून ही बाब कोणाला सांगितल्यास मुलीला शाळेतून काढण्याची धमकी देखील दिली.
संतापलेल्या पालकांनी घटनेची माहिती चाइल्ड हेल्पलाइनला दिली. घटनेची माहिती मिळतात चाइल्ड हेल्पलाइनच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनीच्या घरी जाऊन चौकशी करून खात्री केली. चाईल्ड हेल्पलाइनच्या हस्तक्षेपानंतर शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.