राजस्थानमध्ये दुहेरी हत्येची धक्कादायक घटना
पतीने पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलीची हत्या केली
आरोपीने स्वतः पोलिसांकडे जाऊन गुन्हा कबूल केला
पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू
Rajasthan Sujeet Singh Murder Wife And Daughter राजस्थानमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची आणि मुलीची निर्घृण हत्या केली आहे. बायको सतत पगारावरून टोमणे मारते आणि अपमान करते म्हणून संतापून या व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव सुरजीत सिंग आहे. सुरजीतने सांगितल की, तो एका कारखान्यात काम करतो. त्याला महिन्याला १०,००० रुपये पगार मिळतो. मात्र त्याच्या पत्नीला तो कमी वाटायचा. त्यामुळे त्याची पत्नी सगळ्यांसमोर त्याचा अपमान करायची. या कारणावरून दोघांमध्ये खटके उडायचे.
घटनेच्या दिवशी म्हणजेच बुधवारी पहाटेच्या सुमारास सुजितचं त्याच्या पत्नीसोबत वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की सुजितने धारदार शस्त्राने तिची हत्या केली. यावेळेस बाजूला सुजीतची ७ वर्षांची मुलगी गाढ झोपेत होती. मात्र आईच्या किंचाळण्याच्या आवाजाने ती खडबडून जागी झाली आणि ओरडू लागली. सुजितने घाबरून तिचा गळा दाबून हत्या केली.
हत्येनंतर तो घराबाहेर पडला आणि वाटेत भेटेल त्याला सांगत सुटला की, त्याने त्याच्या पत्नी आणि मुलीची हत्या केली आहे. त्यानंतर तो पोलिस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याला ताबडतोब ताब्यात घेतले आणि घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. तसेच याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.