सोलापूर-विजापूर बायपास रोडवर भीषण अपघात
कारची कंटेनरला जोरदार धडक
दोन तरुणांचा जागीच मृत्यू
पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू
विश्ववभूषण लिमये, सोलापूर
Solapur Vijapur Bypass Road Accident 2 Boys Dies सोलापूर शहरातील सोलापूर-विजापूर बायपास रोडजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कारची कंटेनरला जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तरुणांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात इमादुद्दीन बागवान आणि अमन बागवान या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी रोजा इफ्तार केल्यानंतर हे दोघे तरुण चहा पिण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी बाहेर निघाले होते. रात्री ८.३० ते ९ च्या सुमारास सोलापूर-विजापूर बायपास रोडजवळ त्यांच्या कारची कंटेनरला जोरदार धडक झाली.
अपघात इतका भीषण होता कि कारचा अक्षरशः चक्काचूर झाला,.तर या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची रुग्णवाहीका तात्काळ घटनास्थळी झाली. तर घटनेची माहिती मिळताच सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.