Shocking : पंचविशीतील तरूण-तरुणी हॉटेलच्या खोलीत गेले, मॅनेजरला संशय आला; पोलिसांनी दार उघडताच दिसलं भयंकर दृश्य
दिल्लीतील हॉटेलमध्ये २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला
तरुणीसोबत आलेला बॉयफ्रेंड घटनास्थळावरून फरार झाला
पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेतला
प्रकरणाचा तपास सुरू
Delhi Hotel Found 25 Year Old Girl Dead Body दिल्लीत एका हॉटेलच्या रूममध्ये बेडवर २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सदर घटना ११ मार्चच्या मध्यरात्री लाहोरी गेट परिसरात घडली. धक्कादायक म्हणजे मुलीसोबत आलेला बॉयफ्रेंड याने घटनस्थळावरून पलायन केले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी ११ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अभिषेक तिवारी (२४) या तरुणासोबत हॉटेलमध्ये आली होती. अभिषेक तिवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास हॉटेलमधून बाहेर पडला आणि त्याने रूमला बाहेरून कुलूप लावलं. बराच वेळ झाला कोणीही दार न उघडल्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत रूमचा दरवाजा उघडला. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर सगळ्यांना धक्कादायक दृश्य दिसले . पोलिसांच्या माहितीनुसार, खोलीत एका तरुणीचा मृतदेह नको त्या अवस्थेत बेडवर पडलेला होता आणि त्यावर अंशतः चादर टाकलेली होती.
बेडवर तसेच आजूबाजूला पडलेल्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसत होते. खोलीची अवस्था पाहता तेथे काहीतरी गंभीर प्रकार घडल्याचे स्पष्ट दिसत होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालात तरुणीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलीस अधिकारी म्हणाले. दरम्यान या प्रकरणी पुढील तपास सुरु असून पोलीस फरार अभिषेकचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
