Rain Alert : महाराष्ट्रात कुठे उन्हाचा कडाका, तर कुठे धो धो पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Today Weather News : महाराष्ट्रात ऊन पावसाचा लपंडाव सुरु आहे. विदर्भात उकाडा वाढला आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करत हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
Rain Alert : महाराष्ट्रात कुठे उन्हाचा कडाका, तर कुठे धो धो पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Today Weather NewsSaam Tv
Published On
Summary
  • विदर्भात उष्णतेची तीव्र लाट, अमरावतीत ४१°C तापमान

  • काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

  • सातारा आणि कोल्हापुरात गारांसह पाऊस

  • हवामान विभागाने काही भागांसाठी येलो अलर्ट जारी केला

Mahrashtra Today 15th March Weather Temprature राज्यात उन्हाच्या कडाक्यासोबत काही भागांत पावसाळी वातावरण झालेलं पाहायला मिळत आहे. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली असून अमरावती येथे देशातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद झाली. आज विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. तसेच कमाल तापमान ४० अंशापार गेल्यास व तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. अमरावतीत सलग तिसऱ्यादिवशी ४१ अंश इतके तापमान नोंदवण्यात आले.

Rain Alert : महाराष्ट्रात कुठे उन्हाचा कडाका, तर कुठे धो धो पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज
Nashik : नाशिक हादरले! पोलिस असल्याचे सांगत व्यापाऱ्याचे अपहरण, २५ लाखांची खंडणीची मागणी; छळादरम्यान दुर्दैवी मृत्यू

आज अकोला, अमरावती येथे उष्ण लाटेची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Rain Alert : महाराष्ट्रात कुठे उन्हाचा कडाका, तर कुठे धो धो पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज
Shocking : पंचविशीतील तरूण-तरुणी हॉटेलच्या खोलीत गेले, मॅनेजरला संशय आला; पोलिसांनी दार उघडताच दिसलं भयंकर दृश्य

सातारा आणि कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा व तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com