Nashik : नाशिक हादरले! पोलिस असल्याचे सांगत व्यापाऱ्याचे अपहरण, २५ लाखांची खंडणीची मागणी; छळादरम्यान दुर्दैवी मृत्यू

Nashik News : नाशिकमध्ये पोलिस असल्याचे सांगून व्यापाऱ्याचे अपहरण करून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात व्यापाऱ्याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
Nashik : नाशिक हादरले!  पोलिस असल्याचे सांगत व्यापाऱ्याचे अपहरण, २५ लाखांची खंडणीची मागणी; छळादरम्यान दुर्दैवी मृत्यू
Nashik Devala Road Tragedy NewsAI
Published On
Summary
  • नाशिकमध्ये बनावट पोलिस असल्याचे सांगून व्यापाऱ्याचे अपहरण

  • आरोपींनी २५ लाख रुपयांची खंडणी मागितली

  • वादाच्या दरम्यान छातीत दुखू लागल्याने मृत्यू

  • तीन संशयित आरोपींना अटक

अजय सोनावणे, मनमाड

Nashik Devala Road Tragedy News नाशिकमध्ये पोलिस पथक असल्याचे सांगून, गुटख्याने भरलेली पिकअप अडवून, २५ लाख रुपयांची खंडणीसाठी अपहरण करून दिलेल्या त्रासातून नाशिकच्या देवळा तालुक्यातील व्यापाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत शिताफीने अटक केली. जब्बार तांबोळी असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तांबोळी हे गुजरातमधून पिकअप वाहनातून गुटखा भरून अभोणामार्गे देवळ्याकडे येत होते. या दरम्यान देवळा- कळवण रस्त्यावरील भऊर फाट्यावर काळया रंगाचे स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या तिघांनी त्यांना अडवलं. आम्ही पोलिस महानिरीक्षक पथकातील अधिकारी असल्याचे बतावणी करून २५ लाखांची खंडणी मागितली. खंडणीसाठी मृत जब्बार आणि पिक अप चालकाचे अपहरण केले.

Nashik : नाशिक हादरले!  पोलिस असल्याचे सांगत व्यापाऱ्याचे अपहरण, २५ लाखांची खंडणीची मागणी; छळादरम्यान दुर्दैवी मृत्यू
Akola : रुग्णाकडून डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, सलाईनचे स्टँड डोक्यात घातले; नेमकं कारण काय?

अखेर तडजोडी अंती ११ लाख रुपये खंडणी देण्याचे ठरले. ठेंगोडा परिसरातील एका नर्सरीजवळ जब्बार यांचा मुलगा व काही ग्रामस्थ रक्कम घेऊन पोहचले. त्याचवेळी तांबोळी आणि संशयित आरोपींमध्ये बाचाबाची झाली. त्यातच जब्बार यांच्या छातीत दुखू लागले आणि ते बेशुध्द पडले. जब्बार बेशुद्ध पडल्यानंतर संशयितांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

Nashik : नाशिक हादरले!  पोलिस असल्याचे सांगत व्यापाऱ्याचे अपहरण, २५ लाखांची खंडणीची मागणी; छळादरम्यान दुर्दैवी मृत्यू
Accident News : देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, भरधाव टेम्पोची कारला धडक; महाराष्ट्रातील ३ जणांचा राजस्थानमध्ये मृत्यू

दरम्यान बेशुध्द अवस्थेतील जब्बार तांबोळी यांना दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी विलास जगताप, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक तसेच महेश भामरे या तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com