अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांवर रुग्णाने हल्ला केला
मेडिकल डिस्चार्ज कागदपत्रांवरून वाद झाला
सलाइन स्टॅन्डने डॉक्टरवर हल्ला
या घटनेनंतर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत
अक्षय गवळी, अकोला
Akola Government Hospital Patient Attacks Doctorअकोला जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात एका संतप्त रुग्णाने डॉक्टरांवर हल्ला केला. वैद्यकीय कागदपत्रे देण्यास नकार दिल्याने हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात संबंधित डॉक्टर गंभीर जखमी झाले असून या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या प्रकरणी हल्लेखोर रुग्णाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यांनतर रुग्ण मो शाहरूख आरिफ खान यांनी वॉर्ड क्रमांक 12 व 13 मधील डॉ. प्रथमेश सरनाईक, डॉ. शुभम सैनी आणि रुग्णसेवक सुशील मेड यांच्याकडे मेडिकल डिस्चार्ज कागदपत्रांची मागणी केली. परंतु रुग्णालयाच्या नियमानुसार वैद्यकीय कागदपत्रे बाहेर देणे शक्य नसल्यामुळे डॉक्टरांनी त्याला कागदपत्रे देण्यास नकार दिला.
त्यामुळे संतप्त झालेल्या मोहमद शाहरूख खानने डॉक्टरांवर सलाइन स्टॅन्डने हल्ला केला. या हल्ल्यात डॉ. सरनाईक किरकोळ जखमी झाले. या घटनेने रुग्णालयातील सेवा देणाऱ्या इंटर्न डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी सुरक्षित नसल्याचा गंभीर सवाल उपस्थित केला आहे.
यासंदर्भात असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न महाराष्ट्र संघटनेचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांना निवेदन दिले असून, डॉक्टरांना सुरक्षितता देण्याची मागणी करण्यात आली आहे. या हल्ल्याबाबत सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.