Rain Alert : ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार, पुण्यासह या जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

Maharashtra Today Weather News : महाराष्ट्रात उष्णतेची लाट सुरू असतानाच १३ आणि १४ मार्च रोजी काही भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अमरावतीत ४२.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
Rain Alert : ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार, पुण्यासह या जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे
Maharashtra Today Weather NewsSaam Tv
Published On
Summary
  • महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम असून काही भागात तापमान ४० अंशांपेक्षा जास्त आहे

  • १३ आणि १४ मार्च रोजी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

  • अमरावतीत ४२.२ अंश तापमानाची नोंद

  • मुंबई आणि कोकणात उष्ण व दमट वातावरण कायम राहणार

Maharashtra Today Friday Weather Update राज्यात नागरिक उकाड्याने हैराण होत असतानाच ऐन उन्हाळ्यात आता पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस हा पाऊस कायम राहणार आहे. १३ आणि १४ मार्च रोजी पुणे, विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकण पट्ट्यात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहील.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मागील ४८ तासांमध्ये उत्तर कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट आलेली आहे. पुढील काही दिवसात मुंबई आणि उत्तर कोकण भागात अति उष्ण आणि दमट वातावरण राहील असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सध्या सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होताना पाहायला मिळते आहे. १३, १४ आणि १५ मार्च रोजी दक्षिण महाराष्ट्र आणि राज्यातील काही भागातील विजांच्या कडकडाटासह पावसाची देखील शक्यता पुणे वेधशाळेनी वर्तवली आहे.

Rain Alert : ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार, पुण्यासह या जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे
Sambhajinagar : ठाकरे गटाच्या नेत्यावर मध्यरात्री चाकू हल्ला; संभाजीनगरमध्ये खळबळ

अमरावती हे राज्यात सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. शहरात गुरुवारी तब्बल ४२.२अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याचे आग ओकने सुरू झाले असून दिवसाचा पारा झपाट्याने वर गेला आहे . ज्यामुळे विदर्भातील काही शहरांना उष्ण लाटेचा सामना करावा लागत आहे.

Rain Alert : ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार, पुण्यासह या जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे
Maternity Leave : कोणताही नियम महिलेला मातृत्व रजा घेण्यापासून रोखू शकत नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

याशिवाय अकोला येथे ४२, यवतमाळ ४०, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी ४०.८, नागपूर ३९ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले.दरम्यान एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बदलत्या हवामानामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com