Sambhajinagar : ठाकरे गटाच्या नेत्यावर मध्यरात्री चाकू हल्ला; संभाजीनगरमध्ये खळबळ

Sambhajinagar Thackeray Leader Attack : छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या नेत्यावर मध्यरात्री चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात कृष्णा राठोड आणि त्यांचे सहकारी मन्नू राठोड गंभीर जखमी झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Sambhajinagar : ठाकरे गटाच्या नेत्यावर मध्यरात्री चाकू हल्ला; संभाजीनगरमध्ये खळबळ
Sambhajinagar Thackeray Leader Attack Saam Tv
Published On
Summary
  • वाळूज एमआयडीसी परिसरात मध्यरात्री चाकू हल्ल्याची घटना

  • ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख कृष्णा राठोड आणि मन्नू राठोड गंभीर जखमी

  • दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी कामगार चौकात हल्ला केला

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Uddhav Thackeray Shiv Sena leader Krishna Rathod stabbing छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात त्यांच्यासोबत असलेले सहकारी मन्नू राठोड हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना १० मार्च रोजी मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास कामगार चौक परिसरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,कृष्णा राठोड यांचे कामगार चौकात ‘जय भवानी’ नावाचे हॉटेल आहे. रात्री हॉटेल बंद करून कृष्णा राठोड व त्यांचे सहकारी मन्नू राठोड हे चारचाकी वाहनाने घरी जात होते. कामगार चौकात पोहोचताच समोरून आलेल्या दुचाकीवरून तिघा अज्ञातांनी त्यांचा रस्ता अडवला. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली.

Sambhajinagar : ठाकरे गटाच्या नेत्यावर मध्यरात्री चाकू हल्ला; संभाजीनगरमध्ये खळबळ
Pune : अंत्यसंस्कारही वेटिंगवर! पुण्यातील गॅस दाहिन्या बंद; इराण-इस्रायल युद्धाच्या झळा स्मशानभूमीला

या झटापटीदरम्यान अज्ञात आरोपींनी कृष्णा राठोड यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मन्नू राठोड यांच्यावरही आरोपींनी चाकूने वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले.

Sambhajinagar : ठाकरे गटाच्या नेत्यावर मध्यरात्री चाकू हल्ला; संभाजीनगरमध्ये खळबळ
Kalyan : कल्याणकर संतापले! भूमाफियांविरोधात चक्क 'म्हैस' घेऊन थेट KDMC कार्यालयात धडक, वाचा नेमकं प्रकरण काय?

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत दोघांनाही छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या दोघांवर उपचार आहे. दरम्यान, हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणावरून केला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com