Pune : अंत्यसंस्कारही वेटिंगवर! पुण्यातील गॅस दाहिन्या बंद; इराण-इस्रायल युद्धाच्या झळा स्मशानभूमीला

Pune Gas Fuel Shortage News : इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असून भारतात गॅस तुटवडा जाणवू लागला आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Pune : अंत्यसंस्कारही वेटिंगवर! पुण्यातील गॅस दाहिन्या बंद; इराण-इस्रायल युद्धाच्या झळा स्मशानभूमीला
Pune Gas Fuel Shortage NewsSaam Tv
Published On
Summary
  • इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम

  • भारतात गॅस तुटवडा जाणवू लागल्याने पुण्यात गॅस दाहिन्या बंद

  • वैकुंठ स्मशानभूमीतील तीन गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या

  • आपत्कालीन परिस्थितीसाठी पेट्रोल-डिझेल साठा राखण्याचे प्रशासनाचे आदेश

सचिन जाधव, पुणे

Israel Iran War Impact On India LPG Gas इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून महायुद्ध सुरु आहे. दोन्हीकडून एकमेकांना दमदार प्रत्युत्तर दिले जात आहे. शनिवारी इराणच्या मोठ्या तेल शुद्धीकरणाच्या प्रकल्पावर हल्ला करण्यात आला या हल्ल्यामुळे मोठा भडका उडाला. या युद्धाची झळ भारतवासियांना देखील बसली आहे. भारतात घरगुती गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. अलीकडेच गॅस बुकिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. त्यानंतर आता पुणे शहरातील समशानभूमीच्या महानगरपालिकेच्या गॅस आधारित विद्युत दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भारत सरकारच्या अधिपत्याखालील पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, देशभरात उपलब्ध असलेल्या प्रोपेन व ब्यूटेन या घटकांचा वापर प्रामुख्याने घरगुती एलपीजी पुरवठ्यासाठी प्राधान्याने करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गॅस उपलब्धतेमध्ये तुटवडा निर्माण झाल्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विद्युत दाहिनी व APC (Air Pollution Control) प्रणालीवर आधारित दाहिन्या सुरू ठेवण्यात येणार आहेत.वैकुंठ स्मशानभूमी येथे कार्यरत असलेल्या तीन गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद राहतील. त्याऐवजी नागरिकांच्या सोयीसाठी तेथील पाच विद्युत दाहिन्या कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत देण्यात आली आहे.

Pune : अंत्यसंस्कारही वेटिंगवर! पुण्यातील गॅस दाहिन्या बंद; इराण-इस्रायल युद्धाच्या झळा स्मशानभूमीला
Kalyan : कल्याणमध्ये रक्ताने माखलेल्या कारचे रहस्य उलगडले, इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्याने केली उबर चालकाची हत्या; धक्कादायक कारण समोर

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

युद्धामुळे जर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला तर आपत्कालीन सेवांवर परिणाम होईल म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने आपत्कालासाठी पेट्रोल, डिझेलचा साठा आरक्षित ठेवा असे आदेश सर्व पेट्रोल- डिझेल वितरण करणाऱ्या रिटेल सेल्स ऑफिसरला दिल्या आहेत. युद्धपरिस्थितीमुळे पेट्रोल, डिझेलचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता आगामी काळात नाकारता येत नाही. युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक पातळीवर पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवण्याचे आदेश सर्व इंधन विक्री कंपन्यांना जारी केले आहेत.

Pune : अंत्यसंस्कारही वेटिंगवर! पुण्यातील गॅस दाहिन्या बंद; इराण-इस्रायल युद्धाच्या झळा स्मशानभूमीला
Maharashtra Politics : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हाअध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण आले समोर

इंधन पुरवठा कंपन्यांना सक्तीचे आदेश

आखातातील युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थाची पुरवठा साखळी खंडित होण्याची स्थिती उद्भवू शकते. त्यामुळे स्थानिक पातळीवर पेट्रोल- डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. पेट्रोल-डिझेल अत्यावश्यक सेवेत येते. आपात्कालीन परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या शासकीय वाहनांना इंधन तुटवडा निर्माण होणार नाही. कोणतेही पेट्रोल पंप मालक आपत्कालीन परिस्थितीमध्ये साठेबाजी करणार नाहीत, तसेच त्यांना दरवाढीने इंधनही विकता येणार नाही. तालुका आणि जिल्हा पातळीवरील शासकीय वाहनांसाठी पर्याप्त प्रमाणात पेट्रोल डिझेल साठा आरक्षित ठेवावा, असे सक्तीचे आदेश बीपीसीएल, आयओसीएल, एचपीसीएल या इंधन पुरवठा कंपन्यांच्या रिटेल सेल्स ऑफिर्ससना देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com