टिटवाळ्यात रक्ताने माखलेली उबेर कार सापडल्याने खळबळ
चालक नासीर अन्सारीचा मृतदेह ओतूर परिसरात सापडला
पैशाच्या वादातून प्रवासी विद्यार्थ्यासोबत झटापट झाली
झटापटीत चालकाचा मृत्यू; पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
काही दिवसांपूर्वी टिटवाळ्यात रक्ताच्या दागाने माखलेली उबेर कार सापडली होती. या गाडीचा चालक बेपत्ता होता. अखेर चालकाचा मृतदेह ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडला आहे. या प्रकरणाच्या तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. दमदाटी करून पैसे मागितल्याच्या रागातून झटापटीत ही हत्या झाली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु केला आहे. विद्यार्थ्याने केलेल्या खुलासानुसार चालकाची हत्या करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. मात्र नियतीने डाव आखला आणि एक चालक जीवानिशी गेला तर, विद्यार्थ्याचे आयुष्य उद्धवस्त झाले.
टिटवाळा येथील गोवेली रोडवर रक्ताच्या दागाने माखलेली एक उबेर कार आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. टिटवाळा पोलिस या प्रकरणाचा तपास करीत होते. नक्की या गाडीचा चालक कुठे आहे. त्याच्यासोबत काय घडले आहे याचा तपास पोलिसांनी सुरु केला. टिटवाळा पोलीलांसह ठाणे एलसीबी देखील तपास करीत आहे. ठाणे एलबीसीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांच्या पथकाने हा तपास सुरु केला. पोलिस अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांच्या पथकाने उबेर कंपनीची ही कार असल्याने रोडमॅप आणि शेवटचा प्रवासी कोण आहे? याचा शोध लावला.
पोलिसांना माहिती मिळाली की, आदर्श भालेराव नावाच्या व्यक्तीने ही गाडी पुण्याला जाण्यासाठी बुक केली होती. आदर्श हा इंजिनिरिंगच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. तो त्याच्या मैत्रीणीला भेटण्यासाठी पुण्याला निघाला होता. त्यासाठी त्याने उबेर कार बुक केली. गाडी चालक नासीर अन्सारी आला. त्याने प्रवासी आदर्शला घेऊन पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. गाडी गणेश खिंडीजवळ आली असता नासीर याने गाडी थांबवली. नासीरने चाकूचा धाक दाखवून आदर्शकडे पैशाची मागणी केली. तुझ्याकडचे पैसे बऱ्या बोलाने दे असे म्हटले. यावेळी आदर्शने प्रतिकार केला. त्यांच्यात जोरदार झटापट झाली.
या झटापटीत नासीरच्या हातीतील चाकू आदर्शनच्या हाती आला. तो नासीरच्या गळ्याला लागल्याने नासीरचा गळा चिरला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. नासीरचा मृतदेह तिथेच टाकून आदर्शने उबेर गाडी टिटवाळ्याला आणली. गाडी टिटवाळा गोवेली रस्त्यावर टाकून पळून गेला. पोलिस तपास हे उघड झाले की, नासीरला पैशाची गरज होती. त्याने चार पाच जणांकडून पैसे मागितले होते. आदर्शचा हेतू नासीरची हत्या करण्याचा नव्हता. मात्र हा गुन्हा घडला. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. या प्रकरणी ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.