Beed : महाराष्ट्र हादरला! हातपाय बांधले, तोंडामध्ये कपड्याचा बोळा कोंबला; १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार
पालकांच्या तक्रारीनंतर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार असून पोलिस तपास सुरू
घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे
Beed Parali Minor Girl Rape Case बीडच्या परळीमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परळी तालुक्यातील धारावती तांड्यावर सदर घटना घडली आहे. याप्रकरणी मुलींच्या पालकांनी दोघांविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेने पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला दोन नराधमांनी आपल्या घरी लाडाने बोलावून घराचा दरवाजा बंद करून एकाने मुलीचे हातपाय बांधले, तोंडामध्ये कपड्याचा बोळा कोंबून ठेवला आणि तिच्यावर आळीपाळीने अतिशय निर्दयीपणे लैंगिक अत्याचार केले. तसेच कोणाला सांगितले तर तुला जीवे मारून टाकू असे धमकावून पीडित मुलीला सोडून दिले.
हा सर्व प्रकार त्या मुलीने घरी आल्यानंतर आपल्या आई-वडिलांना सांगितला. संतापलेल्या आई-वडिलांनी तातडीने परळी ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून त्या दोन नराधमाविरोधात पोस्को अंतर्गत गु.र.न 125/2026 कलम 64,127(2),351(2),352,3(5), भारतीय न्याय संहिता सहकलम 4,17, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा दाखल केला. यामधील दोन्ही आरोपी फरार झाले असून त्या नराधमांचा तपास उपविभाग अंबाजोगाई पिंक पथक आणि स.पो.नी संतोष जाधववर हे करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
