Accident News : दुर्दैवी! थांबलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक, ३ पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Karanataka Car Accident News : कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कार आणि उभ्या ट्रकची भीषण धडक होऊन तीन पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Accident News : दुर्दैवी! थांबलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक, ३ पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर
Karanataka Car Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • चित्रदुर्गमध्ये कार-ट्रकची भीषण धडक

  • तीन पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू

  • दोन पोलीस अधिकारी गंभीर जखमी

  • बेंगळुरूहून बल्लारीला जाताना अपघात

  • पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला

Karanataka Chitradurga Accident three Police Sub-Inspectors Killed कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या कार अपघातात तीन पोलिस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना आज सकाळी चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्गा तालुक्यातील हेगेरेजवळ घडली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाच पोलिस अधिकारी बेंगळुरूहून बल्लारीला एका कार्यक्रमासाठी जात होते. यादरम्यान चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्गा तालुक्यातील हेगेरेजवळ कार एका उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर २ पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत.

Accident News : दुर्दैवी! थांबलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक, ३ पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर
Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

मंजुनाथ, अंबरीश आणि सचिन अशी मृत आरएसआयची ओळख पटली आहे. तसेच एसआय ईश्वर आणि आरएसआय महांतेश गंभीर जखमी झालेल्या अधिकाऱ्यांचं नाव आहे. हे पाचही जण नुकतेच पोलीस दलात भरती झाले होते.

Accident News : दुर्दैवी! थांबलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक, ३ पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर
Nagpur : गणित चुकलं म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण, शिक्षकांची पालकांनाही धमकी, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक घटना

पोलीस अधिकाऱ्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची माहिती मिळताच चित्रदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक रणजित बंडारू आणि आयमंगला स्टेशनचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com