LPG Cylinder Blast : सिलिंडरच्या भीषण स्फोटात तीन घरे उध्वस्त, दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

Tamilnadu Chennai LPG Cylinder Blast News : चेन्नईत एलपीजी सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन दोन मुलांचा मृत्यू झाला आहे, तसेच सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत तीन घरे कोसळली असून पोलिस आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे.
LPG Cylinder Blast : सिलिंडरच्या भीषण स्फोटात तीन घरे उध्वस्त, दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू, ७ जण गंभीर जखमी
Tamilnadu Chennai LPG Cylinder Blast 2 Child DeadSaam Tv
Published On
Summary
  • चेन्नईतील नवलूर येथे एलपीजी सिलेंडरचा भीषण स्फोट

  • दोन मुलांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

  • स्फोटामुळे तीन घरे कोसळली

  • पोलिस आणि अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरू

Tamilnadu Chennai LPG Cylinder Blast 2 Child Dead चेन्नईमध्ये आज सकाळच्या सुमारास एलपीजी सिलेंडरच्या भीषण स्फोटात दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला असून सात जण गंभीर भाजले आहेत. ही घटना सकाळी ७:४० च्या सुमारास चेन्नई दक्षिणच्या ओएमआर परिसरातील नवलूरमधील चामुंडेश्वर नगर येथे घडली आहे. या दुर्घटनेत घरांचेही नुकसान झाले आहे. तामिळनाडू पोलिस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू केले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नई दक्षिणच्या ओएमआर परिसरातील नवलूरमधील चामुंडेश्वर नगर, तिसऱ्या स्ट्रीटमध्ये एका घरात सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. तीन घरे बाजूबाजूला लागून असल्याने तिन्ही घरांना आगीने वेढा घातला होता.

LPG Cylinder Blast : सिलिंडरच्या भीषण स्फोटात तीन घरे उध्वस्त, दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू, ७ जण गंभीर जखमी
Nagpur : गणित चुकलं म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण, शिक्षकांची पालकांनाही धमकी, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक घटना

आज रविवार सुट्टी असल्याने घरात सगळेच उपस्थित होते. याच वेळेस स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या आगीत एकाच कुटुंबातील दोन भावंडांचा मृत्यू झाला. तसेच ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की, तिन्ही घरे कोसळली. या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले. स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

LPG Cylinder Blast : सिलिंडरच्या भीषण स्फोटात तीन घरे उध्वस्त, दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू, ७ जण गंभीर जखमी
Pune : पुण्यात सैराट! फोन करून बोलावलं, जीव जाईपर्यंत मारलं; प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या

त्यांनी तात्काळ पोलिस आणि अग्निशमन विभागाला माहिती दिली. थझांबूर पोलिस स्टेशन आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य हाती घेतले. या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com