Pune : पुण्यात सैराट! फोन करून बोलावलं, जीव जाईपर्यंत मारलं; प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या

Pune Crime News : पुण्यात प्रेमप्रकरणातून २३ वर्षीय नागेश जाधव या तरुणाची बेदम मारहाण करून हत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Pune : पुण्यात सैराट! फोन करून बोलावलं, जीव जाईपर्यंत मारलं; प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या
Pune Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यात प्रेमप्रकरणातून २३ वर्षीय तरुणाची हत्या

  • प्रेयसीच्या कुटुंबीयांनी बोलावून बेदम मारहाण केल्याचा आरोप

  • उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

  • पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

सागर आव्हाड, पुणे

पुण्यात प्रेम प्रकरणातून प्रेयसीच्या कुटुंबीयांनी तरुणाला घरी बोलवून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव नागेश जाधव (वय २३) असे आहे. नागेश हा पुण्यातील शिवाजीनगर येथे ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. त्याची आई घरकाम करते. १४ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास नागेशला एक फोन आला. त्यानंतर तो तातडीने घरातून दुचाकी घेऊन निघाला. त्यानंतर रात्री ८ च्या सुमारास नागेशच्या फोनवरून एका व्यक्तीने त्याच्या आईला फोन करून शिवीगाळ केली. तसेच आम्ही नागेशला मारलं असून त्याला घेऊन जा नाहीतर फेकून देऊ अशी धमकी दिली.

Pune : पुण्यात सैराट! फोन करून बोलावलं, जीव जाईपर्यंत मारलं; प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या
HIV Injection Attack : लगीन मोडल्यामुळे संतापला, तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही इंजेक्शन; वाचा सविस्तर

पीडित मुलाच्या कुटुंबीयायांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळेस तिथे तरुणाला बेदम मारहाण करत होते. पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले. यावेळेस नागेशच्या आईने त्याला नेमकं काय घडलं विचारले असता, त्याने सांगितले की त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबीयांनी तिच्या नंबरवरून नागेशला मेसेज करून बोलावून घेतलं. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली.

Pune : पुण्यात सैराट! फोन करून बोलावलं, जीव जाईपर्यंत मारलं; प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या
Nagpur : गणित चुकलं म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण, शिक्षकांची पालकांनाही धमकी, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक घटना

नागेशला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत तरुणाच्या आईने पोलीस ठाण्यात संबंधित मुलीच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याघटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com