HIV Injection Attack : लगीन मोडल्यामुळे संतापला, तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही इंजेक्शन; वाचा सविस्तर

Hyderabad News : हैद्राबादमध्ये लग्न मोडल्याच्या रागातून एका तरुणाने तरुणीला एचआयव्ही बाधित रक्ताचे इंजेक्शन दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीआरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
HIV Injection Attack : लगीन मोडल्यामुळे संतापला, तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही इंजेक्शन; वाचा सविस्तर
Hyderabad Pocharam Man Injects Woman HIV Infected Blood Saam Tv
Published On
Summary
  • हैद्राबादमधील पोछाराम येथे धक्कादायक घटना

  • लग्न मोडल्याच्या रागातून तरुणाने तरुणीला एचआयव्ही रक्ताचे इंजेक्शन दिल्याचा आरोप

  • पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली

  • आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल

Hyderabad Pocharam Man Injects Woman HIV Infected Blood हैद्राबादमध्ये लग्नाला नकार दिल्याने एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीला HIV बाधित रक्ताचे इंजेक्शन दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित तरुणीचं आणि तरुणाचं लग्न ठरलं होत. मात्र लग्नापूर्वी तरुणाच्या रक्तात एचआयव्ही आढळल्याने. मुलीच्या वडिलांनी लग्न मोडलं. याचाच राग मनात ठेवून तरुणाने हे पाऊल उचलले असल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना हैद्राबाद मधील पोछाराम येथे घडली आहे. आरोपी तरुण आणि पीडित तरुणी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. तरुणीच्या आई-वडिलांनी तिचं लग्न आरोपी तरुणासोबत ठरवलं होतं. मात्र तरुणाचे आई-वडील एचआयव्ही बाधित असल्याने पीडितेच्या आई-वडिलांनी सदर तरुणाची एचआयव्ही चाचणी केली होती. या चाचणीमध्ये सदर तरुण एचआयव्ही बाधित असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तरुणीच्या वडिलांनी हे लग्न रद्द केलं.

HIV Injection Attack : लगीन मोडल्यामुळे संतापला, तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही इंजेक्शन; वाचा सविस्तर
Nagpur : गणित चुकलं म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण, शिक्षकांची पालकांनाही धमकी, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक घटना

या निर्णयामुळे संतापलेला तरुण ११ मार्च रोजी पीडित तरुणीच्या घरी गेला. तिला जबरदस्तीने एचआयव्हीबाधित रक्ताचं इंजेक्शन दिलं. या घटनेनंतर पीडित तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत सदर तरुणाविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. तसेच त्याच्यावर कारवाई केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com