कुठे बोगस मतदान, कुठे मशीनमध्ये घोळ तर कुठे पैसे वाटप, म्हणे लोकशाहीचा उत्सव, राज्यात मतदानाच्या दिवशी जोरदार राडा

Maharashtra Local Elections 2026 Voting Chaos: महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या दिवशी जळगाव, अकोला, पिंपरी आणि संभाजीनगरमध्ये बोगस मतदान, EVM मशीन बिघाड आणि मतदार राड्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Voters clash at polling stations in Maharashtra amid allegations of bogus voting and malfunctioning EVM machines.
Voters clash at polling stations in Maharashtra amid allegations of bogus voting and malfunctioning EVM machines.AI
Published On

जळगाव शहरातील आर. आर. विद्यालय येथील मतदान केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपामुळे आज गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रभाग क्रमांक पाचमध्ये अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख, माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्यात थेट लढत सुरू आहे. सकाळपासून संशयास्पद मतदार आल्याचा आरोप करत ॲड. पियुष पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

Voters clash at polling stations in Maharashtra amid allegations of bogus voting and malfunctioning EVM machines.
Municipal Election : भाजपच्या पोलिंग एजंटकडून आचारसंहितेचा भंग, मीरा रोडमध्ये सकाळी नेमकं काय झालं?

त्यानुसार ४० ते ४५ मतदारांकडून ओळखपत्र आणि आवश्यक पुरावे मागवण्यात आले. मात्र, ते सादर न होऊ शकल्याने संबंधितांना मतदान करू देण्यात आले नाही. या प्रभागात सुमारे तीन हजारांहून अधिक बोगस आणि दुबार मतदार असल्याची तक्रार आपण यापूर्वीही केल्याचा दावा पाटील यांनी केला. या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली असून या सर्व घडामोडींमुळे आर. आर. विद्यालयातील मतदान केंद्रावर काही काळ तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.

Voters clash at polling stations in Maharashtra amid allegations of bogus voting and malfunctioning EVM machines.
Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी बळीराजाच्या खात्यात ₹२००० जमा होण्याची शक्यता

मतदान केंद्रावर वादाचे रूपांतर हाणामारीत; अकोल्यात पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात

अकोल्यातल्या एका मतदान केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाला आणि वादांचं रूपांतर किरकोळ हाणामारीमध्ये झाले. अकोला महापालिकेतील प्रभाग 17 मधील भांडपुरा चौकातल्या महापालिकेच्या उर्दू कन्या शाळेच्या मतदान केंद्रावरील हा प्रकार घडला आहे. या मतदान केंद्रावर लोकांची मोठी गर्दी होती. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने पोलिसांच्या हस्तक्षेपांनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान पोलिसांनी मतदान केंद्राबाहेर जमलेली गर्दी पांगवली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असून मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवला गेला आहे.

Voters clash at polling stations in Maharashtra amid allegations of bogus voting and malfunctioning EVM machines.
ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

EVM मशीन बिघाडाचा आरोप; संभाजीनगरमध्ये मतदारांच्या लांबच लांब रांगा,

संभाजीनगर मध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान गोंधळ उडाला आहे. संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरात मतदान यंत्रावरील बटन काम करत नसल्याने उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. तर मतदारांच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रांगा लागल्या आहेत. आम्ही किती वेळ रांगेत उभे राहायचे असा प्रश्न मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना केला आहे. प्रभाग क्रमांक 9 मधील मतदान केंद्र क्रमांक 15 मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. दरम्यान एमआयएमचे उमेदवार काकासाहेब काकडे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना मतदान केंद्रात जाऊन जाब विचारला आहे.

Voters clash at polling stations in Maharashtra amid allegations of bogus voting and malfunctioning EVM machines.
Manoj Jarange: ना महायुतीला, ना महाविकास आघाडीला... निवडणुकीसाठी कुणालाही पाठिंबा नाही, मनोज जरांगेंची स्पष्ट भूमिका

पिंपरीत मतदान केंद्रावर राडा, निवडणूक अधिकाऱ्यांची गाडी रोखली

बोगस मतदानाचा आरोप करत एका महिलेने मतदान केंद्रावर चांगलाच राडा घातला आहे. तसेच राडा घातल्यानंतर तिने निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांची गाडी देखील रोखून धरली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील कल्पतरू ह्या उच्चभ्रू लोकांच्या सोसायटी मधील मतदान केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मतदार यादीत नाव नाहीत मतदार याद्या व्यवस्थित नाहीत. उमेदवाराला न विचारता EVM मशीन वरील स्टिकर निवडणून विभागाने काढले तसेच बदलून टाकले आहते. असा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचे नातेवाईक विद्या जवळकर यांनी केला आहे.

या सर्व आक्षेप विषयी विद्या जवळकर या महिलेने निवडणूक विभागाकडे तक्रार केली होती मात्र तिच्या तक्रारीची निवडणूक विभागाने हवी तशी दखल न घेतल्याने तिने मतदान केंद्रावर चक्क राडा घालून निवडणूक विभागाची गाडी रोखून धरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com