

Summary -
अकोल्यातील शेगाव- अकोट रस्त्यावर भरदिवसा तरुणाची निर्घृण हत्या
गौरव बायस्कारला चार जणांनी चाकूने भोसकून जागीच संपवलं
हत्या प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती
दोन संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच अकोल्यात देखील अशीच घटना घडली आहे. अकोल्यातल्या शेगावमध्ये प्रेम प्रकरणातून भयंकर हत्याकांड घडलं. एका तरुणाची भररस्त्यात चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. गौरव बायस्कार असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव होते. चार जणांनी रस्त्यात गौरवला गाठून जागीच संपवलं. या घटनेमुळे अकोल्यात खळबळ उडाली आहे.
अकोला जिल्ह्यातील शेगाव -अकोट रस्त्यावर गौरव बायस्कार या तरुणाची हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणातून गौरववर चौघांनी जीवघेणा हल्ला केला. भरस्त्यावर त्याच्यावर चाकूने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गौरवने जागीच प्राण सोडले. गौरवचे मारेकरी हे लोहाऱ्यातील मोरे कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.
लोहारा गावातील मोरे कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील आणि इतर २ जण या चौघांनी एकत्रित गौरवची हत्या केली. अकोला जिल्ह्यातील अकोट- शेगाव रस्त्यावरील अंदुरा फाट्यावर भर दिवसा हे हत्याकांड घडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणात उरळ पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. मारेकऱ्यांनी गौरव बायस्कार याच्यावर चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं. या प्रकरणात उरळ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
निंबा फाटा ते तेल्हारा मार्गावर कारंजा (रमजानपूर) फाट्याजवळ दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गौरवचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. प्रेम प्रकरणातून गौरवची हत्या झाल्याचे बोलले जात आहे. पण अद्यापही हत्येमागील मूळ कारण पोलिसांनी स्पष्ट केले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.