Crime News : २४ वर्षांच्या तरुणीनं जाळं टाकलं, मुंबईचा बिल्डर अडकला; लॉजवर बोलावलं, आरेच्या जंगलात नेऊन...

Mumbai Crime News : मुंबईतील व्यावसायिकांना टार्गेट करून लुटणाऱ्या सेक्स्टॉर्शन रॅकेटचा आरे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका तरुणीलाही बेड्या ठोकल्या आहेत.
आरेच्या जंगल परिसरात मुंबईतील व्यावसायिकाला लुटलं, पोलिसांनी रॅकेटचा केला पर्दाफाश
आरेच्या जंगल परिसरात मुंबईतील व्यावसायिकाला लुटलं, पोलिसांनी रॅकेटचा केला पर्दाफाश saam tv
Published On

संजय गडदे, मुंबई | साम टीव्ही

मुंबई शहरातील व्यावसायिकांना लक्ष्य करून सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून लूट करणाऱ्या टोळीला आरे पोलिसांनी अवघ्या ७ तासांत गजांआड केले आहे. 20 ते 25 वयोगटातील महिला आणि तरूण पुरुष अशा चार जणांच्या टोळीने अनेक व्यावसायिकांना जाळ्यात ओढून लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

देवनारमध्ये राहणाऱ्या ४५ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाला २४ वर्षीय शहरीन औरंगजेब कुरेशी या मुलीने ओळखीचा बहाणा करून जाळ्यात ओढले. पवईतील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतल्यानंतर ही मुलगी आणि तिचे साथीदार त्या व्यावसायिकाला गोरेगाव-आरे परिसरात घेऊन गेले. तेथे त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून गळ्यातील चार तोळ्याची चेन लंपास करण्यात आली.

आरेच्या जंगल परिसरात मुंबईतील व्यावसायिकाला लुटलं, पोलिसांनी रॅकेटचा केला पर्दाफाश
Pune : महिलेचा पुरूषावर बलात्कार, अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल, पुण्यात खळबळजनक घटना

या प्रकरणी आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच आरे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे टोळीचा माग काढला. देवनार आणि डोंबिवलीतून चारही आरोपींना फक्त ७ तासांत अटक केली.

आरेच्या जंगल परिसरात मुंबईतील व्यावसायिकाला लुटलं, पोलिसांनी रॅकेटचा केला पर्दाफाश
Mumbai Crime News : हॉटेलवर नेलं, अमली पदार्थ देऊन बेशुद्ध केलं, घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार; मुंबईतील कार चालकाचा कारनामा

विशाल सिद्धार्थ वाघ (वय 27), नमेश नागेश सुर्वे (वय 23), जहागीर सलाउद्दीन कुरेशी (वय 25), शहरीन औरंगजेब कुरेशी (वय 24) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सध्या सर्व आरोपी आरे पोलिसांच्या ताब्यात आहेत. आरोपींनी अशा प्रकारे किती लोकांची फसवणूक केली आहे, याबाबत तपास करण्यात येत आहे.

पोलिसांनी चोरी गेलेला शंभर टक्के मुद्देमालही हस्तगत केला आहे. या टोळीकडून मुंबईतील वयस्कर व्यावसायिकांना लक्ष्य करून अशाच प्रकारे लूटमार केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास आरे पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com