Pune : महिलेचा पुरूषावर बलात्कार, अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल, पुण्यात खळबळजनक घटना

Woman accused of raping and extorting man in Pune : महिलेकडून पुरुषावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला. कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Pune
Pune
Published On
Summary

कोथरूड येथे महिलेकडून पुरुषावर गुंगीचे औषध देऊन अत्याचार झाल्याची तक्रार दाखल झाली.

अत्याचाराचे फोटो आणि व्हिडिओ काढून महिलेने पीडित पुरुषाकडे पैशांची मागणी केली.

आरोपी महिलेने स्वतःला वकील असल्याचे सांगून धमक्या दिल्याचेही तक्रारीत नमूद.

कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune woman assaults man : महिलेने पुरुषावर अत्याचार केल्याच्या घटना पुण्यात घडली आहे. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. महिलेकडून अश्लील फोटो अन् व्हिडिओ दाखवत पुरूषाकडे वारंवार पैशांची मागणी केली जात होती, असेही सांगण्यात येत आहे. पुरूषावर बलात्कार केल्याची घटना समोर येताच एकच खळबळ उडाली आहे.

Pune
Local Body Election : काँग्रेस जिल्हाअध्यक्षाचे अपहरण अन् मारहाण, VIDEO ने महाराष्ट्रात खळबळ, हिंदुत्ववादी संघटनेवर आरोप

गुंगीचं औषध देऊन कोल्हापूरच्या एका व्यक्तीवर अत्याचार केला आहे. अत्याचार करतानाचे पुरूषासोबतचे अश्लील फोटो, व्हिडिओ महिलेने काढले. त्याचाच वापर करून सविता त्या व्यक्तीला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होती. मी वकील आहे, अशी धमकीही त्या महिलेने त्याला दिली होती.

Pune
Accident : लग्नाहून येताना पूलावरून नदीत कोसळली कार, ५ जणांचा जागेवरच मृत्यू

पुण्यातील महिलेचे राहते घर, कोल्हापूर येथील फिर्यादीचे घर घेण्यासाठी पुरुषावर बळजबरीचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुरुषाला बळजबरीने काशी विश्वनाथ या ठिकाणी घेऊन अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कोथरूड पोलिसाकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

Pune
Heartbreaking! अर्ध्या तासात विधवा झाली, लग्नमांडवात नवरदेवाला हार्टअटॅकचा झटका, लग्न सोहळ्यात शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com