Heartbreaking! अर्ध्या तासात विधवा झाली, लग्नमांडवात नवरदेवाला हार्टअटॅकचा झटका, लग्न सोहळ्यात शोककळा

Amravati Wedding News : अमरावतीच्या वरुड तालुक्यातील पुसला गावात लग्नानंतर अवघ्या अर्ध्या तासात नवरदेव अमोल गोड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आनंदी लग्नसोहळा क्षणात शोककळेत बदलला. कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.
Amravati Latest
Amravati LatestSaam TV Marathi News
Published On
Summary
  • वरुड तालुक्यातील पुसला गावात लग्नानंतर ३० मिनिटांत नवरदेवाचा मृत्यू झाला.

  • अमोल गोड हे कोतवाल म्हणून कार्यरत होते.

  • मंडपात अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी मृत घोषित केले.

  • आनंदी लग्नसोहळा क्षणात शोकांतिका ठरली व दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

Amravati Latest News : थाटामाटात लग्न पार पडताच फक्त अर्ध्या तासातच नवरदेवाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला. अमरावतीमधील वरुडमध्ये ही ह्रदयद्रावक घटना घडली. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनं लग्न मांडवात शोककळा पसरली. मृत झालेल्या नवरदेवाचे नाव अमोल गोड असे आहे. नवरदेवाचा मृत्यू झाल्याने आनंदी उत्सव सुरू असलेल्या लग्नमांडवात काही क्षणातच शोककळा पसरली. अमोल गोड हे कोतवाल म्हणून कार्यरत होते. त्यांचं लग्नाच्या दिवशीच निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमरावतीत वरुड तालुक्यातील पुसलामध्ये लग्नसोहळ्यात हृदयद्रावक घटना घडली. लग्नानंतर अवघ्या अर्ध्या तासात नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अमोल गोड असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. लग्नानंतर नवरदेवाला चक्कर येताच मंडपात खळबळ उडाली. पाहुण्यांनी तातडीने नवरदेवाला रुग्णालयात पाठवले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. लग्नाचा आनंद क्षणात दुःखदायक शोकांतिका ठरला. वर आणि वधूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

Amravati Latest
Accident : लग्नाहून येताना पूलावरून नदीत कोसळली कार, ५ जणांचा जागेवरच मृत्यू

अमरावतीमधील वरुड तालुक्यातील पुसला गावात अमोल गोड हे कोतवाल म्हणून कार्यरत होते. त्यांचं थाटमाटात लग्न पार पडले. वधू आणि वर पक्षामध्ये आनंदाचे वातावरण होते. पण ज्या ठिकाणी सनईचे सूर वाजत होते, त्याच ठिकाणी नवरदेवाचा मृत्यू झाल्याने स्मशान शांतता पसरली. आयुष्याचा सर्वात आनंदी दिवस असतानाच नवरी विधवा झाली. नवरदेवाचा हॉर्ट अटॅकने मृत्यू मृत्यू झाला अन् कुटुंबावर शोककळा पसरली.

Amravati Latest
Sambhajinagar : धक्कादायक! समाज कल्याणच्या वसतिगृहातील जेवणात आढळली पाल, विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com