

लग्नाहून परत येत असताना लखीमपूर खिरी येथे कार पूलावरून नदीत कोसळली.
अपघातात पाच जणांचा जागेवर मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला.
चालकाला झोप लागल्याने वाहनाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक पोलिसांचा अंदाज.
सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले असून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
uttar Pradesh Lakhimpur Kheri Road Accident : लग्नाच्या वरातीनंतर घराकडे येताना कार उंच ब्रिजहून नदीत कोसळली, या दुर्घटनेत पाच जणांचा जागेवरच मृत्यू झालाय. एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची ही दुर्दैवी घटना उत्तर प्रेदशमधील लखीमपुर खीरी येथे मंगळवारी रात्री उशिरा घडली. या घटनेनंतर लग्नघरावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.(Lakhimpur Kheri accident wedding return details)
लखीमपूरमधील एका लग्न समारंभात सहभागी झाल्यानंतर कारमधील सर्व प्रवासी बहराइच येथे आपल्या घरी परत येत होते. रात्री १२ वाजताची वेळ होती, चालकाला गाडी चालवताना डोळा लागला. त्यामुळे गाडीचे नियंत्रण सुटले आणि ती थेट ब्रिजवरून खाली कोसळली, असा प्राथमिक अंदाज पोलिस स्टेशनचे प्रभारी अभिषेक सिंह यांनी व्यक्त केला आहे.
अपघाताची माहिती मिळताच अभिषेक सिंह आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मध्यरात्रीच तातडीने बचाव कार्य सुरू केले. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या चालक बबलूला वाचवले. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. कारमधील इतर पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जितेंद्र, घनश्याम, लालजी, अझीमुल्ला आणि सुरेंद्र विशुशोखा यांचासमावेश आहे. हे सर्वजण बहराइच जिल्ह्यातील सुजौली परिसरात राहणारे आहेत.
पोलिसांनी पाचही जणांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमार्टमसाठी लखीमपूर सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत. या दुःखद अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रथामिक तपासानुसार, चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात झाला आहे. पोलिसांकडून या अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.