Local Body Election : भाजप आमदार अत्याचार करत आहेत, शिवसेना आमदाराचे धक्कादायक विधान

MLA Santosh Bangar : हिंगोलीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या घरावर १०० पोलिसांनी मध्यरात्री झडती घेतल्याचा संतोष बांगर यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. तानाजी मुटकुळे यांच्या विरोधातील आरोपामुळे स्थानिक राजकारण तापले आहे.
Shinde Sena vs BJP clash during Hingoli civic elections
Shinde Sena vs BJP clash during Hingoli civic electionssaam
Published On
Summary
  • तानाजी मुटकुळे यांनी १०० पोलिसांना मध्यरात्री त्यांच्या घरी झडतीसाठी पाठवल्याचा गंभीर आरोप केला.

  • शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी भाजप आमदारावर गंभीर आरोप केला.

  • पोलिसांनी फ्रिज, कपडे आणि घरातील सर्व वस्तू उलथून पाहिल्याचा आरोप केला.

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना–भाजपमध्ये संघर्ष वाढला आहे.

Shinde Sena vs BJP clash during Hingoli civic elections : एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत. भाजपच्या आमदाराने मध्यरात्री शंभरहून अधिक पोलिसांना सर्च वॉरंट घेऊन आपल्या घरी पाठवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. बांगर आणि भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यातील या आरोप-प्रत्यारोपामुळे हिंगोलीतील राजकारण प्रचंड तापले आहे.सिद्धार्थ नगर परिसरात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गेले असताना आमदार संतोष बांगर यांनी जाहीर सभेत हा बॉम्बगोळा फोडला. “भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी माझ्या घरात शंभर पोलीस पाठवून छापा टाकला. मध्यरात्री मुले झोपलेली असताना पोलीस सर्च वॉरंट घेऊन आले. फ्रिज उघडले, कपडे उचकटले, घराची पूर्ण तपासणी केली,” असा थेट आरोप बांगर यांनी केला.

भाजप आमदार आमच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत. पोलिसांवर दबाव आणून शंभर पोलीस घरी पाठवत आहेत. माझे पुतणे भाचे यांना नोटीसा देण्यात येत आहेत, व्यायाम शाळेची तपासणी केली आहे.
संतोष बांगर, शिवसेना शिंदे गट आमदार

भाजपच्या आमदाराने माझ्या घरात शंभर पोलीस पाठवून तपासणी केली असा आरोप केला. मध्यरा‍त्री मुलं झोपली असताना पोलीस सर्च वॉरंट घेऊन आल्याचे बांगर यांनी आरोप केला. हिंगोली भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी हे पोलीस पाठवले असल्याचा थेट आरोप आमदार बांगर यांनी केला आहे. माझ्या घरातील फ्रिज, कपडे देखील पोलिसांनी उचकटून पाहिल्याचं बांगर म्हणाले. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस २८ तारखेला हिंगोलीत जाहीर सभा घेत आहेत, त्या आधीच संतोष बांगरांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

Shinde Sena vs BJP clash during Hingoli civic elections
Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची आचारसंहिता लागू होताच हिंगोलीत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली जिल्ह्यात स्वबळाचा नारा देत हिंगोली पालिकेसाठी आपल्या मोठ्या वहिनी रेखा श्रीराम बांगर यांना हिंगोली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे केले तर कळमनुरी पालिकेत आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला बांगर यांनी तिकड दिले.

Shinde Sena vs BJP clash during Hingoli civic elections
Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

मात्र वसमत पालिकेत संतोष बांगर यांनी राजकीय सेटलमेंट करत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली आहे. दरम्यान संतोष बांगर यांच्या या निर्णयानंतर हिंगोली भाजपने जोरदार तयारी सुरू करत तिन्ही पालिकेत आपले मातब्बर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे हिंगोलीत प्रचाराला सुरुवात होण्याआधी पासून शिवसेना भाजपचे नेते एकमेकांना भिडले.

Shinde Sena vs BJP clash during Hingoli civic elections
Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

संतोष बांगर हे अवैध धंदे करतात असा आरोप आमदार तानाजी मुटकुळे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. हिंगोली पोलीस आमदार बांगर यांना पाठीशी घालत असल्याचा देखील आमदार मुटकुळे म्हणाले होते. दरम्यान या आरोपानंतर हिंगोली पोलिसांच्या पथकाने संतोष बांगर यांचे निवासस्थान असलेल्या वंजारवाडा भागात छापा टाकत घराची झडती घेतली, यावरून आता संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा भाजपला घेरत भाजपचे आमदार पोलिसांना सांगून आपल्याला मुद्दामून त्रास देत असल्याचा आरोप केला. हिंगोलीत शिवसेना-भाजपच्या दोन्ही आमदारांमध्ये आरोप्रत्यारोप सुरू आहे.

Shinde Sena vs BJP clash during Hingoli civic elections
Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com