Local Body Election : काँग्रेस जिल्हाअध्यक्षाचे अपहरण अन् मारहाण, VIDEO ने महाराष्ट्रात खळबळ, हिंदुत्ववादी संघटनेवर आरोप

Ahilyanagar Crime Latest Marathi News : अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे श्रीरामपूर येथे मॉर्निंग वॉकदरम्यान अपहरण करून मारहाण करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणात खळबळ.
Congress
CongressSaam tv
Published On
Summary
  • अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे सकाळी मॉर्निंग वॉकदरम्यान अपहरण करण्यात आले.

  • त्यांना कारमध्ये घेऊन मारहाण करण्यात आल्याचा आरोप; सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध.

  • घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट असून पोलिसांनी तपास सुरू केला.

  • निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापले असून अपहरणामागील कारणांचा पोलिसांकडून शोध सुरू.

सचिन बनसोडे, साम टीव्ही प्रतिनिधी

Congress District Chief Sachin Gujar Kidnapped : अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे. अपहरण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. श्रीरामपूरमध्ये जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करण्यात आले. त्यांना मारहाणही झाल्याचे माहिती मिळाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर अहिल्यानगर आणि श्रीरामपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्यामुळे राज्यात चर्चेला उधाण आले आहे.

जिल्हाध्यक्ष सचिन गुजर हे नित्य नियमाप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे अपहरण करण्यात आले. सचिन गुजर यांचे अपहरण करतानाचा सीसीटीव्ही पोलिसांना मिळाला आहे. श्रीरामपूर पोलिसांकडून या घटनेची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. नेमकी कोणत्या कारणामुळे त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यांना का मारहाण करण्यात आली, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून काही जणांचे जबाब नोंदवले जात आहेत.

Congress
Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसकडून कऱण्यात येत आहे. आज सकाळी सात वाजता सचिन गुजर यांचे अपहरण करण्यात आले. त्यांना कारमध्ये बेदम मारहाणही करण्यात आली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. सचिन गुजर यांनी तात्काळ कार्यकर्त्यांसोबत श्रीरामपूर पोलीस स्टेशन गाठले अन् आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी गुन्हा नोंदवल आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असतानाच मारहाणीची घटना घडल्यामुळे नगरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे.

Congress
Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडूून जोरदार प्रचार केला जात आहे. सचिन गुजर यांनी काँग्रेससाठी अहिल्यनगर जिल्हा पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. थोड्याच दिवसात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी गुजर यांनी नगरमध्ये काँग्रेसची ताकद वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. निवडणुकीची तयारी सुरू असतानाच गुजर यांना मारहाण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Congress
Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com