Mumbai Crime News : हॉटेलवर नेलं, अमली पदार्थ देऊन बेशुद्ध केलं, घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार; मुंबईतील कार चालकाचा कारनामा

Mumbai : मुंबईतील ऑपेरा हाऊस परिसरात घरकाम करणाऱ्या महिलेवर ड्रायव्हरकडून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने अमली पदार्थ देऊन महिलेचे अश्लील फोटो काढले आणि ब्लॅकमेल करून ८५ हजार रुपये उकळले.
Mumbai Crime News : हॉटेलवर नेलं, अमली पदार्थ देऊन बेशुद्ध केलं, घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार; मुंबईतील कार चालकाचा कारनामा
Saam Tv
Published On
Summary

दक्षिण मुंबईतील ऑपेरा हाऊस परिसरात ड्रायव्हरकडून घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार

आरोपीने अमली पदार्थ देऊन महिलेचे अश्लील फोटो काढले आणि ब्लॅकमेल करून पैसे उकळले

वारंवार धमकावून आरोपीने अनेकवेळा जबरदस्ती केली

पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिला ज्या घरात घरकाम करत होती त्याच घरातील ड्राइव्हरने बलात्कार केला. शिवाय या दरम्यान आरोपीने महिलेचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल केले. सदर घटना ही दक्षिण मुंबईतील माता रमाबाई परिसरात असणाऱ्या ऑपेरा हाऊस येथे घडली आहे. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील ऑपेरा हाऊस परिसरात एक महिला घर काम करते. ही महिला ज्या घरात घरकाम करते त्याच घरातील घर मालकाच्या ड्राइव्हरने या महिलेशी ओळख केली. हळूहळू या दोघांमधील संवाद वाढला. या संवादातून या दोघांमध्ये मैत्री वाढली. दोघेही एकाच गावातले असल्याने जवळचे संबंध आणखी दृढ झाले.

Mumbai Crime News : हॉटेलवर नेलं, अमली पदार्थ देऊन बेशुद्ध केलं, घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार; मुंबईतील कार चालकाचा कारनामा
Shocking : मोठ्या मुलाने केली आई आणि धाकट्या भावाची हत्या, दुहेरी हत्याकांडामागे धक्कादायक कारण

या मैत्रीनंतर ड्रायव्हरने पीडितेला एका हॉटेलवर खोटं सांगून बोलावलं. महिला हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर, त्याने तिला अमली पदार्थ मिसळलेले पेय दिले. ते पिल्यानंतर महिला बेशुद्ध पडली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती नग्न अवस्थेत होती. आरोपीने त्याच्या फोनवर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ देखील काढले.

Mumbai Crime News : हॉटेलवर नेलं, अमली पदार्थ देऊन बेशुद्ध केलं, घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार; मुंबईतील कार चालकाचा कारनामा
Shocking : धक्कादायक! १४ वर्षीय मुलाची ४० वर्षीय महिलेवर वाईट नजर; लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, विरोध करताच तिला संपवलं

महिलेने फोटो डिलीट करण्यास सांगितले तेव्हा आरोपीने तिला धमकावण्यास सुरुवात केली. त्याने महिलेच्या खात्यातून ८५,००० रुपये तिच्या फोनद्वारे त्याच्या एका साथीदाराच्या खात्यात ट्रान्सफर केले. या घटनेनंतर, महिला तिच्या गावी गेली, परंतु आरोपीने तिला फोन करून धमकावणे सुरूच ठेवले. १९ ऑगस्ट २०२५ रोजी, आरोपीने तिला पुन्हा त्याच हॉटेलमध्ये बोलावून जुने अश्लील फोटो दाखवत धमकी दिली आणि पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. सप्टेंबर २०२५ मध्येही, आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी महिलेवर अनेक वेळा जबरदस्ती केली. या प्रकरणाला कंटाळून महिलेने मन एकवटून पोलीस ठाणे गाठले.

Mumbai Crime News : हॉटेलवर नेलं, अमली पदार्थ देऊन बेशुद्ध केलं, घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार; मुंबईतील कार चालकाचा कारनामा
Shocking : बुलढाण्यात एक ते दीड वर्षाच्या मुलीचे अवशेष सापडले, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

संबंधित आरोपी चालकाविरोधात महिलेने तक्रार दाखल केली. पीएसआय अनिल राठोड आणि इन्स्पेक्टर वासंती जाधव यांच्या पथकाने आरोपीला वाळकेश्वर येथे अटक केली. त्याच्याकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. शिवाय आरोपीने अशा प्रकारे कोणत्या महिलांना लक्ष्य केले आहे का हे देखील पोलिस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com