Shocking : बुलढाण्यात एक ते दीड वर्षाच्या मुलीचे अवशेष सापडले, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे एका चिमुकलीच्या शरीराचे अवशेष सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांच्या तपासानंतर या मुलीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं आणि जनावराने प्रेत बाहेर काढल्याचं स्पष्ट झालं आहे.
Shocking : बुलढाण्यात एक ते दीड वर्षाच्या मुलीचे अवशेष सापडले, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा
Buldhana NewsSaam Tv
Published On
Summary

बुलढाणा जिल्ह्यात चिमुकलीच्या शरीराचे अवशेष सापडले

पोलिसांचा धक्कादायक खुलासा

मुलीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट

जनावराने प्रेत बाहेर काढल्याने परिसरात भीतीचे वातावरण

बुलढाण्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात एक ते दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलीच्या शरीराचे अवशेष सापडल्याने खळबळ उडाली आहे. सदर घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी धक्कदायक खुलासा केला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, मेहकर तालुक्यातील पीर मोहम्मद पहाडिया परिसरात एका ते दीड वर्षाच्या मुलीचा कंबरेखालचा भाग आणि एक पाय आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वरिष्ठ अधिकारी, फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला घटनास्थळी पाचारण केलं. सुरुवातीला ही घटना घातपाताची असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

Shocking : बुलढाण्यात एक ते दीड वर्षाच्या मुलीचे अवशेष सापडले, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा
Cyclone Alert : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? पुढील २४ तास महत्त्वाचे, सतर्कतेचा इशारा

पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर अलीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर जानेफळ रस्त्यावरील पालवात राहणाऱ्या एका भटक्या कुटुंबातील दीड वर्षाच्या बालिकेची प्रकृती अचानक बिघडली होती. तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला तातडीने हलविण्याचा सल्ला दिला. मात्र उपचारापूर्वीच या चिमुकलीने रस्त्यातच अखेरचा श्वास घेतला.

Shocking : बुलढाण्यात एक ते दीड वर्षाच्या मुलीचे अवशेष सापडले, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा
Crime News : कल्याणमध्ये मुलीला भेटायला आली, रिक्षाचालकाने महिलेला फसवले, तब्बल ₹३५०००० लाख सोनं लंपास केले

भटक्या समाजातील हे कुटुंब असल्याने त्यांनी आपला शोक दाबत रात्री जानेफळ रस्त्यालगत असलेल्या महानुभाव पंथाच्या स्मशानभूमी जवळ चिमुकलीवर अंत्यसंस्कार केले. खड्डा पुरेसा खोल न झाल्याने प्रेत नीट पुरले गेले नसल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे रात्री उशिरा मोकाट कुत्र्यांनी तो खड्डा उकरून मृतदेह बाहेर काढला आणि शरीराचे काही भाग फाडून नेले.

Shocking : बुलढाण्यात एक ते दीड वर्षाच्या मुलीचे अवशेष सापडले, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा
Onkar Elephant : नदीत अंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर अमानुष हल्ला, अंगावर सुतळी बॉम्ब फेकले अन्...

या घटनेबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. आतापर्यंत कोणताही संशयास्पद प्रकार आढळलेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सुरुवातीला घातपाताचा संशय होता. पण तपासानंतर स्पष्ट झालं की मुलीचा नैसर्गिक मृत्यू झाला होता. जनावराने प्रेत बाहेर काढल्याने अवशेष सापडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com