Cyclone Alert : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? पुढील २४ तास महत्त्वाचे, सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागली असून, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे पुढील २४ तास हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Cyclone Alert : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? पुढील २४ तास महत्त्वाचे, सतर्कतेचा इशारा
Maharashtra Cyclone NewsSaam Tv
Published On
Summary

महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल

बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ निर्माण

दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा

पुढील २४ तास हवामानात बदल होण्याची शक्यता

महाराष्ट्रात थंडी सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. पहाटे थंडी आणि दुपारच्या वेळेस उकाडा जाणवू लागला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी उशीरा सुरू झाली. पावसाच्या उघडिपीनंतर कोरडे हवामान, निरभ्र आकाश आणि उत्तरेकडील थंड हवा महाराष्ट्राकडे येऊ लागल्याने किमान तापमानात घट होत आहे. खानदेशासह राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यात पारा १४ अंशांच्या खाली आल्याने गारठा वाढू लागला आहे. परंतु बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या नवीन चक्रीवादळामुळे पुढील २४ तास महत्त्वाचे आहेत. राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजनुसार, पुढील २४ तासांत चार ते पाच राज्यांमध्ये हवामान सतत बदलत राहण्याची शक्यता आहे. विशेषतः केरळमध्ये 10 नोव्हेंबरपर्यंत वादळासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे, आंध्र प्रदेश आणि रायमसिला तसेच ईशान्य भागात पावसाचे मोठे संकेत आहेत. पावसासोबतच मोठे वादळ येण्याची शक्यता आहे.

Cyclone Alert : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? पुढील २४ तास महत्त्वाचे, सतर्कतेचा इशारा
Government Hospital : शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार! रुग्णांच्या जेवणात नासलेली अंडी आणि सडलेली फळे, नेमकं काय प्रकरण?

महाराष्ट्रात मात्र सर्वत्र गुलाबी थंडी पसरली आहे. मात्र काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कायम राहणार असून पारा ३० अंशांच्या पार असला तरी तापमानात घट होत आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे ३३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालय येथे राज्याचे हंगामात नीचांकी तापमान नोंदले गेले.

Cyclone Alert : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? पुढील २४ तास महत्त्वाचे, सतर्कतेचा इशारा
Bank News : सांगली जिल्हा बँकेचं तब्बल ५१ कोटींचं नुकसान, आजी-माजी संचालकांना नोटीस, नेमकं प्रकरण काय ?

IMD ने हरियाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेश भागात पर्वतीय वाऱ्यांमुळे थंडी वाढण्याचे संकेत दिले आहेत. हवामान खात्याच्या मते, शनिवार आणि रविवारपर्यंत थंडी अधिक वाढेल. शिवाय पुढील २४ तासात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटांवर वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच वातावरणात होणाऱ्या बदलामुळे महाराष्ट्रात अंडी सोबतच काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com