Shocking : धक्कादायक! १४ वर्षीय मुलाची ४० वर्षीय महिलेवर वाईट नजर; लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, विरोध करताच तिला संपवलं

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे १४ वर्षीय मुलानं ४० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केल्यावर संतापलेल्या मुलानं विळा आणि काठीने हल्ला करून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून सुधारगृहात पाठवलं आहे.
Shocking : धक्कादायक! १४ वर्षीय मुलाची ४० वर्षीय महिलेवर वाईट नजर; लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, विरोध करताच तिला संपवलं
Crime NewsSaam Tv
Published On
Summary

४० वर्षीय महिलेवर १४ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार

लैंगिक शोषणाला नकार दिल्याने मुलाने महिलेची हत्या केली

दुर्घटनेत महिलेची हत्या

पोलिसांचा तपास सुरु

उत्तर प्रदेशातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. १४ वर्षाच्या मुलाने ४० वर्षाच्या महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने नकार दर्शवल्याने या अल्पवयीन मुलाने महिलेची निर्घृण हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे. सदर मुलाला सुधार गृहात पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील हमीरपूरममध्ये एक महिला शेतात गवत कापण्याचं काम करत होती. या दरम्यान तिच्या गावातील १४ वर्षीय मुलाची तिच्यावर वाईट नजर पडली. या मुलाने कोणीही नसल्याचे पाहून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराला तिने विरोध केला. मात्र संतापलेल्या मुलाने तिच्यावर विळा आणि काठीने हल्ला केला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली.

Shocking : धक्कादायक! १४ वर्षीय मुलाची ४० वर्षीय महिलेवर वाईट नजर; लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, विरोध करताच तिला संपवलं
Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

काही तासानंतर गावकऱ्यांना पीडित महिला शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली आणि त्यांनी त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले. नंतर त्याला चंदीगडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे बुधवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनास्थळावरून पोलिसांनी एक विळा, एक काठी, तुटलेला खवले आणि पेनचे तुकडे जप्त केले.

Shocking : धक्कादायक! १४ वर्षीय मुलाची ४० वर्षीय महिलेवर वाईट नजर; लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, विरोध करताच तिला संपवलं
Ajit Pawar News : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक पाऊल पुढे, भाजप-शिवसेनेच्या आधी जाहीर केला उमेदवार

या घटनेनंतर पोलिसांनी काही तासात या घटनेचा छडा लावला. आणि आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेप्रकरणी आरोपी मुलाने कबुली दिली असून त्याला सुधार गृहात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. तसेच आरोपी मुलीची अधिक चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com