महापालिका मतदानापूर्वीच खळबळ; शेकडो मतदान कार्डांचा ढीग आढळला, निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

dhule Poliitcs : महापालिका मतदानापूर्वीच धुळ्यात मोठी खळबळ उडाली आहे. शेकडो मतदान कार्डांचा ढीग आढळल्याची घटना घडली.
Dhule news
Dhule politics Saam tv
Published On
Summary

धुळ्यात घडली खळबळजनक घटना

खासगी व्यक्तीकडे आढळले ५०० हून अदिक मतदान कार्ड

एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आयोगाकडे तक्रार

महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी धुळ्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. धुळ्यात एका व्यक्तीकडे ५०० हून अधिक मतदान कार्ड आढळल्याची घटना घटना समोर आली. या प्रकारानंतर एमआयएम पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदान कार्ड ताब्यात घेतले.

Dhule news
कल्याणमध्ये पुन्हा मोठा राडा; भाजप उमेदवाराच्या समोरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला? व्हिडिओ व्हायरल

मतदान कार्ड ताब्यात घेऊन निडवणूक आगोयाकडे तक्रार केली. त्यानंतर धुळे महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी नितीन कापडणीस यांची भेट घेऊन त्यांच्या टेबलावरच हे सर्व ताब्यात घेतलेले मतदान कार्ड ठेवले. त्यानंतर त्यांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात पोस्ट कार्यालयातून थेट मतदारांच्या घरापर्यंत पोहोचविले जाणारे सीलबंद मतदान कार्ड कुठून आले, असा प्रश्न एमआयएम पक्षाचे पदाधिकारी ईर्षात जहागीरदार यांनी विचारला आहे.

निवडणूक अधिकारी तथा धुळे महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी तात्काळ या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई देखील करण्यात येईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. त्यापूर्वीच पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात घडामोडी घडताना दिसून येत आहेत.

Dhule news
बदलापुरात मोठा राडा; भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, कार्यालयही फोडलं, VIDEO

या संपूर्ण प्रकरणावर निवडणूक अधिकारी नितीन कापडणीस यांनी म्हटलं की, 'धुळ्यातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये खासगी व्यक्तीकडे मोठ्या संख्येने मतदान कार्ड सापडल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. तक्रारदारांनी मतदारांचे ओळखपत्र आणि बंद लिफाफे आमच्याजवळ सादर केले. या तक्रारीची दखल महापालिकेने घेतली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता तक्रार कक्ष स्थापन केला आहे. त्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या खासगी व्यक्तीकडे मतदान कार्ड कसे आले, हे मतदार क्षेत्रातील मतदारांचे कार्ड आहेत का, याची सखोल चौकशी करण्यात येईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com